कोल्हापूर : करुणा शर्मा ( Karuna Sharma) यांनी राजकारणात उडी घेतली असून त्यांनी कोल्हापूर (Kolhapur) उत्तरच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. अर्ज भरल्यानंतर त्यांनी एक प्रतिज्ञापत्रच (Affidavit) सगळ्यांसमोर सादर केले. जिंकल्यानंतर काय करणार हे त्यांनी आताच प्रतिज्ञापत्रावर लिहून देण्याची खेळी खेळली आहे. देशात प्रथमच असे एखाद्या उमेदवाराने केल्याचा दावा त्यांनी केला आहे. करुणा शर्मा या सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. (Karuna Sharma News)
करुणा शर्मा यांनी शिवशक्ती पक्ष स्थापन केला आहे. पक्षाच्या माध्यमातून आगामी लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पोटनिवडणुका अशा सर्व निवडणुका लढवण्याचे त्यांनी जाहीर केले होते. याची सुरवात कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतून झाली आहे. शर्मा यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. शर्मा यांच्या उमेदवारीची फार मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. अर्ज दाखल केल्यानंतर करुणा शर्मा यांनी एक प्रतिज्ञापत्र माध्यमांसमोर सादर केले आहे.
महाराष्ट्रातच नव्हे देशात कोणत्याच आमदाराने असे प्रतिज्ञापत्र सादर केले नाही, असा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे. या प्रतिज्ञापत्रात त्यांनी म्हटले आहे की, विजयी झाल्यानंतर मी पुढील पाच वर्षात स्वतःच्या किंवा मुलांच्या नावे कोणतीही मालमत्ता खरेदी करणार नाही. तसेच, मला मिळणारे दोन लाख रुपयांचे वेतन याच उत्तर विधानसभा मतदारसंघात खर्च करेन. हा खर्च फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर अशा सोशल मीडियातून जनतेसमोर ठेवला जाईल.
मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर करुणा शर्मा चर्चेत आल्या होत्या. आता त्यांनी थेट निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. कोल्हापूर उत्तरमधील पोटनिवडणुकीत करूणा शर्मा याच त्यांच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहेत. मागील काही दिवसांपासून पक्षातर्फे कोण उमेदवार असणार आहे, यावर विचार सुरू होता. अखेरीस करूणा शर्मा यांनीच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष स्थापन केल्यानंतर त्या थेट विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.