KCR Maharashtra Visit : 'केसीआर' सोलापुरात, मग चर्चा तर होणारच! 'या' भेटीने मात्र उडाली खळबळ

KCR In Maharashtra : सरकोली येथे भगिरथ भालके यांचा बीआरएस प्रवेश
Komal Dhoble Meets KCR in Solapur
Komal Dhoble Meets KCR in SolapurSarkarnama
Published on
Updated on

Solapur Political News : राज्यात हातपाय पसरू पाहणाऱ्या बीआरएसचे प्रमुख्य तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा पूर्वनियोजित होता. त्यानुसार ते आज विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेणार आहे. यानंतर ते वाखारी येथे दोन्ही पालखा आणि वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करणार होते. यासाठी त्यांना परवानगी मिळाली नाही. दरम्यान, त्यांच्या ६०० वाहनांच्या ताफ्यामळे राज्यभर चर्चा झाली. दरम्यान, एका भेटीमुळे सोलापूर जिल्हातील राजकारणाला पुन्हा कलाटणी मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Latest Political News)

महाराष्ट्रातील महाराष्ट्रात आपले राजकीय प्रस्थ वाढवण्याच्या दृष्टीने तेलंगणाच्या बीआरएस पक्षाने आपला मोर्चा पूर्ण ताकदीने वळवला आहे. त्यातील पहिली शिकार राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेची केली. सध्या ते पंढरपूर विधानसभा निवडणुकीचे उमेदवार निश्चित मानले जातात. सरकोली येथे आज मंगळवारी (ता. २७) पक्षप्रवेश व मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष अॅड. कोमल ढोबळे-साळुंखे यांनी भेट घेऊन सत्कार केला आहे. या भेटीमुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

Komal Dhoble Meets KCR in Solapur
Eknath Shinde On Hoardings : नेत्यांच्या चमकोगिरीवर मुख्यमंत्री शिंदेंची नाराजी; म्हणाले, 'वारकऱ्यांच्या स्वागताचे..'

सोलापूर येथे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव मुक्कामी होते. यावेळी त्यांची बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. कोमल ढोबळे यांनी भेट घेतली. ही भेट सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले. ही भेट काँग्रेस वर्तुळात धक्का देणारी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. मागील लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवास वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर कारणीभूत ठरले होते. तोच पॅटर्न यंदाच्या लोकसभा निवडणुकीत होतो की काय, अशी चर्चा आता सुरू झाली.

अॅड. कोमल ढोबळे या माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या कन्या असून ढोबळे पालकमंत्री असताना जिल्ह्यात त्यांच्या संपर्क होता. माजी मंत्री ढोबळे कुटुंब मूळचे अक्कलकोट तालुक्यातील असल्यामुळे अक्कलकोट, मंगळवेढा, पंढरपूर या ठिकाणी हे कार्यकर्ते आहेत. याशिवाय शाहू शिक्षण संस्था व बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून राज्यभर मोठे प्रस्थ निर्माण केले. त्यामुळे सोलापूर लोकसभेच्या राखीव जागेसाठी कदाचित बीएसआरच्या त्या उमेदवार होणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

Komal Dhoble Meets KCR in Solapur
Devendra Fadnavis On Ambedkar : “संभाजी महाराजांच्या हत्येच्या कटात हिंदूं भटजीही..,” ; आंबेडकरांच्या विधानावर फडणवीस म्हणाले..

सोलापूर लोकसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षापासून जे प्रश्न आहेत ते प्रश्न जसेच्या तसे आहेत. सत्ता असताना हे प्रश्न सोडवण्यात यश आलेले नाही. विद्यमान खासदारांची पाच वर्षातील झालेली कामगिरी व विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्ष नेतृत्वाने मतदारसंघात केलेले दुर्लक्ष पाहता बीआरएसने राज्यात केलेली एन्ट्री त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात नवख्या उमेदवाराची चर्चा चर्चिले जात आहे. यातच अॅड. कोमल ढोबळे-साळुंखे यांच्या रूपाने हा नवीन पर्याय देखील उपलब्ध होऊ शकतो. दरम्यान या भेटीत काय चर्चा झाली, याचा तपशील हाती आला नसला तरी झालेली भेट मात्र राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून देण्यात ठरली.

याबाबत कोमल ढोबळे-साळुंखे म्हणाल्या, "तेलंगणा सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे स्मारक उभा करून आदर्श निर्माण केला आहे. हे आपल्या राज्य सरकारला जमले नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यासाठी भेट घेतली. अजून कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केलेला नाही. राजकीय घोडा मैदान अजून लांब आहे. ज्यावेळी पक्षप्रवेश होईल त्यावेळी सर्वांना नक्कीच सांगितले जाईल. जो पक्ष माझ्या संघटनेचे सुरू असलेले काम थांबवू नको म्हणेल, त्या पक्षाबरोबर जाणार आहे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com