KDCC Bank : राज्यमंत्र्यांच्या समर्थकांचे निकालाआधीच फटाके; तर विरोधकांची मिरवणूक

KDCC Bank Election : सामन्याचा निकाल आता ७ तारखेला लागणार आहे.
Rajendra Patil Yadravkar- Ganpat Patil 

Rajendra Patil Yadravkar- Ganpat Patil 

Sarkarnama

Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी आज चुरशीचे मतदान पार पडले. सत्ताधारी छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी विरुद्ध शिवसेना प्रणित राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडी अशा सामन्याचा निकाल आता ७ तारखेला लागणार आहे. मात्र आता निकालापुर्वीच शिरोळमध्ये विजयाची मिरवणूक आणि फटाक्यांची आतिषबाजी पार पडली. शिरोळ तालुका सेवा सोसायटी गटाच्या निवडणुकीत विद्यमान संचालक आणि राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर (Rajendra Patil-Yadravkar) यांच्या विरोधात दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील (Ganpat Patil) यांनी शड्डू ठोकला आहे.

यड्रावकर विरुद्ध पाटील या दुरंगी लढतीत आज मतदान केंद्राच्या बाहेरच दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणा-प्रतिघोषणांचे द्वंद रंगले. हायहोल्टेज लढत असल्यामुळे पोलिसांनी ज्यादा कुमक मागवुन कार्यकर्त्यांना शांत केले. दरम्यान विजयाची खात्री दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना असल्याने निवडणुकीपुर्वीच एका गटाने फटाके उडविले तर दुसऱ्या गटाने पुष्पगुच्छ देवुन नेत्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या.

<div class="paragraphs"><p>Rajendra Patil Yadravkar- Ganpat Patil&nbsp;</p></div>
"मोठ्या भावाला भेटायला लागतयं" ; मतदान केंद्रावरचं मंडलिकांनी घेतला मुश्रीफांचा आशीर्वाद

शिरोळमधील पद्माराजे विद्यालयात सेवा सोसायटी गटासह अन्य पाच गटांसाठी चुरशीने मतदान पार पडले. राजेंद्र पाटील यड्रावकर विरुध्द गणपतराव पाटील अशी मात्तबर लढत असल्याने तालुक्‍यातील सुमारे ४ हजार कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर गर्दी केली होती. या गर्दीमुळे वाहतुक कोंडी होत होती. घोषणा-प्रतिघोषणांमुळे तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे व अप्पर जिल्हा उपअधिक्षक जयश्री गायकवाड यांनी २ तास मतदान केंद्रावर तळ ठोकुन कार्यकर्त्यां शांतता राखण्याचा प्रयत्न केला.

<div class="paragraphs"><p>Rajendra Patil Yadravkar- Ganpat Patil&nbsp;</p></div>
कोल्हापूर जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण? मुश्रीफांनी स्पष्टच सांगितलं...

या दरम्यान मंत्री यड्रावकर यांनी चार चाकींमधुन टप्या-टप्याने मतदारांना आणुन मतदान करुन घेतले. ९७ मताचा टप्पा पार केल्यानंतर मंत्री यड्रावकर स्वतः मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरती आले. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत फटाके उडवुन निकालापुर्वीच आनंदोत्सव साजरा केला. तर गणपतराव पाटील सकाळ पासुनच मतदान केंद्राबाहेर येणाऱ्या प्रत्येक मतदाराचे स्वागत करत होते. यावेळी सहलीवर गेलेल्या पाटील समर्थक मतदारांनाही आलिशान गाड्यामधुन मतदान केंद्रावर आणण्यात आले. माजी आमदार उल्हासदादा पाटील, बॅंकेचे माजी चेअरमन विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, धनाजीराव जगदाळे, शेखर पाटील अशा नेत्यांनी समर्थक मतदारांचे मतदान काळजीपुर्वक करुन घेतले. यावेळी काही समर्थकांनी गणपतराव पाटील यांचा पुषपगुच्छ देवुन सत्कार केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com