कोल्हापूर जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण? मुश्रीफांनी स्पष्टच सांगितलं...

KDCC Bank Election : निकाल ७ तारखेला लागणार आहे.
Satej Patil-Hasan Mushreef-Sanjay Mandalik in KDCC Bank Election

Satej Patil-Hasan Mushreef-Sanjay Mandalik in KDCC Bank Election

Sarkarnama

Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी (KDCC Bank Election) आज चुरशीचे मतदान पार पडले. सत्ताधारी छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी विरुद्ध शिवसेना प्रणित राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडी अशा सामन्याचा निकाल आता ७ तारखेला लागणार आहे. मात्र आता निकालापुर्वीच जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण होणार याची जिल्ह्यात चर्चा सुरु झाली आहे. याच चर्चांवर खुलासा करत अध्यक्ष कोण होणार या प्रश्नाचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी स्पष्टच उत्तर दिले. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.

कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी जिल्ह्यात मतदान सुरू असतानाच विजय निश्‍चित असल्याचे हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी बँकेत आपल्या विजयाची केवळ औपचारिकताच राहिली असल्याचे सांगितले. तसेच अध्यक्ष शिवसेना ठरविले काय? या प्रश्‍नावर निवडणुकीत डिपॉझिट जप्त होणाऱ्यांना सुद्धा मी निवडून येणार असे म्हणावे लागते. नाही तर मते कोण देणार. जो विजयी होईल,तो अध्यक्ष निवडेल. मात्र केवळ अध्यक्ष कोण आणि कधी निवडायचा एवढीच औपचारिकता राहिली आहे, असे सांगत त्यांनी एकतर्फी विजय होण्याचे संकेत दिले.

<div class="paragraphs"><p>Satej Patil-Hasan Mushreef-Sanjay Mandalik in KDCC Bank Election</p></div>
"मोठ्या भावाला भेटायला लागतयं" ; मतदान केंद्रावरचं मंडलिकांनी घेतला मुश्रीफांचा आशीर्वाद

यावर पत्रकारांनी विरोधकांची अनामत जप्त होईल, असे तुम्हाला म्हणायचे आहे असा प्रश्न केला. या प्रश्‍नावर त्यांनी डिपॉझिट जप्त होईल असे मी म्हणणार नाही, परंतु होणारा माणूस सुद्धा म्हणतो मी निवडून येणार आहे. तसेच करवीर तालुक्याला अध्यक्षपद द्या अशी मागणी होत आहे या प्रश्‍नावर ठिक आहे, मागणी करणे काही गैर नाही. मात्र आम्ही सर्वजण एकत्रित बसून निर्णय घेईन, असेही मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

<div class="paragraphs"><p>Satej Patil-Hasan Mushreef-Sanjay Mandalik in KDCC Bank Election</p></div>
पृथ्वीराज चव्हाणांच्या अभिनंदनाचे फलक फाडले; सैदापूरात काँग्रेसप्रेमींतून संताप

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या २१ पैकी ६ जागा बिनविरोध झाल्यानंतर १५ जागांसाठी निवडणूक लागली आहे. या निवडणूकीच्या निमित्ताने राज्याच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसणारेच नेते एकमेकांवर टिका करताना दिसून आले. सत्ताधारी छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील, विनय कोरे यांच्या नेतृत्वात मैदानात उतरली आहे. तर शिवसेना प्रणित राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडी खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वात लढाईत उतरली आहे. दोन्ही गटांकडून प्रचाराच्या फैऱ्या झडल्यानंतर आज मतदान पार पडले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com