शिवसेना नेत्यांची चंद्रकांत पाटलांसोबत खलबते!

कोल्हापूर जिल्हा बॅंक निवडणूक : महाविकास आघाडीचा फॉर्म्युला शिवसेना नेत्यांना अमान्य
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या (kdcc bank) निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरोधात प्रबळ पर्याय देण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जोडण्या सुरू केल्या आहेत. त्यात आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, संपतबापू पवार-पाटील यांना सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज आमदार पाटील व संपतबापू यांच्यात यासंदर्भात बैठकही झाली. दरम्यान, या पर्यायासोबत आमदार डॉ. विनय कोरे, प्रकाश आवाडे आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांनीही यावे यासाठी आमदार पाटील प्रयत्नशील आहेत. (Kolhapur District Bank Election: Shiv Sena leader discusses with BJP's Chandrakant Patil)

महाविकास आघाडीचा फॉर्म्युलाच बँकेत वापरला जाणार असे जाहीर केले. पण, यात शिवसेनेला आता असलेल्या दोन जागा व्यतिरिक्त जादा जागा मिळण्याची शक्यता नाही, त्यामुळे आबिटकर यांनाच हे मान्य नसल्याने त्यांच्याकडून पर्यायांची चाचपणी सुरू आहे. पंधरा दिवसांपूर्वीच यावर प्राथमिक चर्चा झाली होती. पण, त्यावेळी आता उमेदवारी मिळण्याची शक्यता नसलेल्या आबिटकर यांच्यासह संपतबापू व नरके यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. पण, कोल्हापुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आल्यानंतर या घडामोडींना पुन्हा वेग आला आहे. त्यातूनच आज चंद्रकांत पाटील-संपतबापू यांच्यात खलबते झाली.

Chandrakant Patil
राष्ट्रवादीने विद्यमान उपाध्यक्षांसह नऊ संचालकांना दिला डच्चू!

निवडणुकीत विकास संस्था गटातील बारा जागा सोडून उर्वरित नऊ जागांपैकी जास्तीत जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न बँकेचे अध्यक्ष ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांचा सुरू आहे. त्यासाठी कोरे, आवाडे व महाडिक यांनाही सोबत घेण्याची तयारी चर्चेच्या माध्यमातून सुरू होती. तोपर्यंत जागा वाटपावरून शिवसेनेचे आबिटकर व नरके हेच यातून बाहेर पडतील अशी शक्यता आहे. राज्यात महाविकास आघाडी असेल, तर जिल्हा बँकेत शिवसेनेला समान वाटा हवा, अशी या दोघांची भूमिका असल्याचे समजते. आबिटकर स्वतःच्या भावासाठी, तर नरके, पवार-पाटील हे कार्यकर्त्यासाठी आग्रही आहेत. याबाबत पवार-पाटील यांनी आबिटकर यांच्याशी प्राथमिक चर्चाही केल्याचे समजते. पण, शिवसेनेच्या राज्यस्तरीय नेतृत्त्वाकडून काही आदेश आले तर नरके-आबिटकर भूमिकेवर ठाम राहतील का? याविषयी भाजपचे चंद्रकांत पाटील साशंक आहेत.

Chandrakant Patil
जिल्हा बॅंकेला डावलल्यानंतर वैशाली नागवडे म्हणाल्या, ‘मी कुठे कमी पडले’!

कोरे यांनीही सत्ताधाऱ्यांकडे अजून दोन तर आवाडे यांनी किमान दोन जागा मिळाव्यात, अशी मागणी केली आहे. सद्या कोरे यांच्यासह त्यांचे दोन संचालक आहे तर आवाडे यांचे एक संचालक आहेत. शिवसेनेला सोबत घ्यायचे झाल्यास या दोघांना वाढीव जागा देणे सत्ताधाऱ्यांना शक्य नाही. याच मुद्यावर आवाडे-कोरे-महाडिक यांनाच भाजपसोबत घेण्याच्या हालचाली चंद्रकांत पाटील यांच्या पातळीवर सुरू आहेत. पण, सत्ताधाऱ्यांसोबतच्या चर्चेत हे तिघेही पुढे गेल्याने ते पुन्हा माघारी जातील का? हा प्रश्‍न आहे.

Chandrakant Patil
‘बबड्या’ जेरबंद असल्याने यंदा ‘डॅडी’चं काय होणार!

पी. एन. पाटलांसोबत जाणे नरकेंसाठी अडचणीचे

विधानसभा निवडणुकीत करवीरमधून पी. एन. पाटील यांनी नरके यांचा पराभव केला. आता महाविकास आघाडीत पी. एन. पाटील मुख्य घटक असताना त्यांच्यासोबत जाणे नरके यांच्यादृष्टीने अडचणीचे आहे. भविष्यातील राजकारणाचा विचार करूनच नरके हे संपतबापू यांच्यासह भाजपसोबतच्या चर्चेत सहभागी असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com