Satej Patil- Dhananjay Mahadik Politics: पाटील-महाडिकांना बाजूला ठेवून कट्टर कार्यकर्त्यांनी दाखवले एकीचे बळ ; शिंगणापुरात घडलं काय ?

Karvir Politics : कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार धनंजय महाडिक विरुद्ध आमदार सतेज पाटील यांचे राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे.
Satej Patil- Dhananjay Mahadik Politics:
Satej Patil- Dhananjay Mahadik Politics:Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार धनंजय महाडिक विरुद्ध आमदार सतेज पाटील यांचे राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. आजही या दोन्ही गटाचा टोकाचा संघर्ष कोल्हापूर जिल्हा अनुभव आहे. जितका संघर्ष या दोघांमध्ये आहे, तितकाच संघर्ष एकमेकांच्या कार्यकर्त्यांमध्येही आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे, आता एकमेकांचे हे कट्टर विरोधक असलेले खासदार महाडिक आणि आमदार पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते एकत्र आले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील शिंगणापूर गावामध्ये लोकनियुक्त सरपंच म्हणून रसिका पाटील याची यापूर्वीच निवड झाली होती. पाटील या आमदार सतेज पाटील यांच्या गटाच्या आहेत. तर उपसरपंच पदी खासदार धनंजय महाडिक गटाच्या सुवर्णा आवळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पण या दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकत्र आल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.

Satej Patil- Dhananjay Mahadik Politics:
Anil Gote News : ‘मराठा’ आंदोलनाला बदनाम करण्यासाठी कटकारस्थान रचले!

गेल्या दीड दशकापासून पाटील आणि महाडिक यांच्यातील संघर्ष सुरू आहे. लोकसभा, विधानसभा,महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या कोणत्याही निवडणुका असो या दोन्ही गटात प्रचंड चुरस पहायला मिळते. काहीवेळा तर या दोन्ही गटाच्या टोकाच्या संघर्षातून कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. शिंगणापुरातील दोन्ही गटांचे कार्यकर्ते मात्र त्याला अपवाद ठरले. शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दोन्ही गटांच्या कार्यकत्यांनी नेत्यांनाच बाजूला ठेवून आघाडी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात याची जोरदार चर्चा आहे.

बंटी पाटील आणि मुन्ना महाडिक, एकेकाळचे जिगरी दोस्त.

२००४ साली एकाच वेळी कोल्हापुरच्या राजकारणात सतेज (बंटी) पाटील आणि धनंजय (मुन्ना) महाडिक यांची जोडी नव्याने सक्रिय झाली. तेव्हा या जोडीने भलभल्यांना घाम फोडला. २००४ साली तत्कालीन काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक यांचे पुतणे धनंजय महाडिक यांनी शिवसेनेकडून लोकसभेची निवडणूक लढवली. सतेज पाटील आणि धनंजय महाडिक दोघांनीही एकाच तालमीत राजकारणाचे धडे घेतले. महादेवराव महाडिक यांच्या तालमीत दोघांनीही राजकीय धडे गिरवले. पक्ष वेगळे असले तरी कोल्हापूरचं राजकारण मात्र महाडिक-पाटील कुटुंबाभोवतीच फिरत होतं.

Satej Patil- Dhananjay Mahadik Politics:
Jalna Protest News : एसटी गाड्यांची जाळपोळ करणाऱ्या ५२ जणांवर गुन्हा दाखल ; सातव्या दिवशी उपोषणकर्ते मागणीवर ठाम..

काही काळानंतर स्थानिक पातळीवरचं राजकारण सोडून त्यांच्या राजकारणाला पक्षीय स्वरूप येऊ लागलं. महाडिकांच्या गटातचाच्या राजकारणातून फारकत घेत सतेज पाटलांनी काँग्रेसमधून स्वतंत्र राजकारण सुरू केलं. तेव्हापासून महापालिका निवडणुकांपासून सुरू झालेला हा संघर्ष 'गोकुळ'पर्यंत पोहचला.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com