Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा! केशवराव भोसले नाट्यगृहासाठी 20 कोटीचा निधी

Keshavrao Bhosale Theater Fire Eknath Shinde : नाट्यगृह अनेक असतात मात्र काही नाट्यगृह अशी असतात ज्यांच्याशी कलावंताचे आणि श्रोत्यांची भावना जोडलेल्या असतात. कोल्हापुरकरांच्या ज्या भावना आहेत त्या आमच्याही आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
Keshavrao Bhosale Theater Fire
Keshavrao Bhosale Theater FireSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News : गीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग मैदान जाळल्याची घटना घडल्यानंतर सर्वस्तरातून शोक व्यक्त होत आहे. आज (शनिवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच केशवराव भोसले नाट्यगृहासाठी 20 कोटीचा निधी जाहीर केला.

'ही वास्तु जशी होती तशी उभारू. हे सर्व काम लवकरात लवकर पूर्ण करू. झालेली घटना दुर्देवी आहे", असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

'नाट्यगृह अनेक असतात मात्र काही नाट्यगृह अशी असतात ज्यांच्याशी कलावंताचे आणि श्रोत्यांची भावना जोडलेल्या असतात. कोल्हापुरकरांच्या ज्या भावना आहेत त्या आमच्याही आहेत.छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या काळात खासबाग आणि नाट्यगृहाची निर्मिती झाली असंख्य कलाकारांचे या नाट्यगृहाची भावनिक संबंध आहेत.', असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Keshavrao Bhosale Theater Fire
Video Raj Thackeray : गचंडी धरू म्हणणाऱ्या मनोज जरांगेंना राज ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले, 'जातीचं राजकारण...'

पाच कोटीचा विमा

झालेली घटना ही वेदनादायी आहे. या नाट्यगृहाचा पाच कोटीचा विमा आहे. सरकारकडून 20 कोटीचा निधी जाहीर करतो. सर्वांचे सहकार्य घेऊनच जुन्या पद्धतीने या इमारतीचे बांधकाम होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

Keshavrao Bhosale Theater Fire
Shivsena UBT : लोकसभेला पराभव तरी ठाकरे गटाकडे विधानसभेसाठी इच्छुकांची रीघ..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com