Shivsena UBT : लोकसभेला पराभव तरी ठाकरे गटाकडे विधानसभेसाठी इच्छुकांची रीघ..

Aspirants flock to the Thackeray group in Sambhaji Nagar : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे दौरे, बैठका, मेळावे सुरू झाले आहेत. आचारसंहिता लागण्याची शक्यता पाहता शिवसेना ठाकरे गटातर्फे महिनाभरापासून जिल्हाभरात पदाधिकाऱ्यांच्या बैठकासह सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे.
Shivsena UBT News
Shivsena UBT NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT Political News : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रकांत खैरे दुसऱ्यांदा पराभूत झाले. 2019 मध्ये अवघ्या साडेतीन हजार मतांनी पराभूत झालेले खैरे यावेळी तिसऱ्या क्रमांकावर गेले. संभाजीनगर वगळता मराठवाड्यातील सात लोकसभा मतदारसंघात मात्र महाविकास आघाडीने विजय मिळवला. लोकसभेला संभाजीनगरात अपयश आले असले तरी विधानसभा निवडणुकीसाठी या पक्षाकडे इच्छुकांची रीघ लागल्याचे चित्र आहे.

विधानसभेच्या वैजापूर मतदारसंघात सर्वाधिक नऊ इच्छुक असल्याचे समोर आले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची तयारी सुरू असून, शिवसेना ठाकरे गटातर्फे इच्छुकांची चाचपणी केली जात आहे. (Shivsena UBT) त्यात वैजापूर मतदारसंघातून सर्वाधिक चुरस असून, तब्बल नऊ जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे. त्यापाठोपाठ फुलंब्री मतदारसंघात सात जणांनी उमेदवारीसाठी दावा केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे दौरे, बैठका, मेळावे सुरू झाले आहेत. त्यामुळे आगामी महिना-दीड महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटातर्फे महिनाभरापासून जिल्हाभरात पदाधिकाऱ्यांच्या बैठकासह सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे.

Shivsena UBT News
Raj Thackeray Vs Shivsena : राज ठाकरेंवर सुपाऱ्या फेकणारे पदाधिकारी आमचेच; पण.... : शिवसेना नेत्याचा मनसेला इशारा

दरम्यान विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मतदाससंघ निहाय्य इच्छुकांची माहिती घेतली. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. (Chhatrapati Sambhajinagar) यावेळी वैजापूर विधानसभा मतदारसंघाला सर्वाधिक चुरस असल्याचे समोर आले. वैजापूरमधून भाऊसाहेब चिकटगावकर, अविनाश गलांडे, सचिन वाणी, संजय निकम, सुभाष कानडे, आनंदीताई अन्नदाते, प्रकाश चव्हाण, वर्षा जाधव, नंदू जाधव यांनी दावा केला आहे.

त्यापाठोपाठ फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून अक्षय खेडकर, नानासाहेब पळसकर, बाबासाहेब डांगे, अशोक शिंदे, जगन्नाथ पवार, शंकर ठोंबरे, सोमनाथ करपे यांनी उमेदवारी मागितली आहे. भाजपचे सलग तीन टर्म आमदार असलेले प्रशांत बंब यांच्याविरोधात गंगापूरमधून ॲड. देवयानी डोणगावकर, कृष्णा पाटील डोणगावकर, लक्ष्मणभाऊ सांगळे, दिनेश मुथा हे मैदानात उतरण्यास इच्छूक आहे.

Shivsena UBT News
BJP Vs Mahavikas Aghadi : 'महाविकास आघाडी लवकरच फुटणार!'; भाजप नेत्याचा सर्वात मोठा दावा, ठाकरेंनाही टोला

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्ह्यातील एकमेव एकनिष्ठ आमदार असलेल्या उदयसिंह राजपूत यांच्या कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत यांच्यासह डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचे एकमेव नाव समोर येत आहे. माजीमंत्री व नुकतेच लोकसभेवर निवडून गेलेले संदीपान भुमरे यांच्या पैठणमधून दत्ता गोर्डे, मनोज पेरे, शुभम पिवळ, बद्रीनारायण भुमरे, विकास गोर्डे आदींनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.

अब्दुल सत्तारांच्या विरोधात दोघेच इच्छूक

जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड-सोयगांव विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून फारसे कोणी इच्छुक दिसत नाही. या मतदारसंघातून विठ्ठल बदर व रघुनाथ घारमोडे या दोघांनीच उमेदवारीसाठी पक्षाला साकडे घातले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण मतदारसंघापेक्षा शहरातील पुर्व, पश्चिम, मध्य मधून लढण्यासाठी इच्छुकांची चांगलीच गर्दी दिसते.

Shivsena UBT News
BJP Vs Shivsena UBT : अर्धवटराव, बालिश, विनोदबुद्धी अन् थेट ठाकरेंच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह; बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

मध्यमतदारसंघातून माजी महापौर नंदकुमार घोडेले, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक यांनी दावा केला आहे. भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश केलेले माजी उपमहापौर राजू शिंदे, बाळासाहेब गायकवाड, मनोज गांगवे, विजयराव साळवे यांनी पश्‍चिममधून संजय शिरसाट यांच्याविरोधात दंड थोपटण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच पुर्वमधून भाजपचे विद्यमान आमदार तथा मंत्री अतुल सावे यांच्याविरोधात राजू वैद्य व विश्वनाथ स्वामी या दोघांची मागणी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com