Sambhaji Raje News: लोकसभेच्या धामधुमीत संभाजीराजेंची वेगळीच चर्चा; लवकरच नव्या भूमिकेत

Nagraj Manjule New Movie Khashaba Jadhav: लोकसभा निवडणुकीत स्वराज्य पक्षाला बाजूला ठेवले असले तरी युवराज संभाजीराजे छत्रपती आता नव्या भूमिकेतून जनतेसमोर येणार आहेत.
Sambhaji Raje
Sambhaji RajeSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: आगामी लोकसभा (Lok Sabha 2024) निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वत्र प्रचाराची धामधूम उडत आहे. राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार अजून गुलदस्तात आहेत. अशातच राजकीय वातावरण आतापासूनच तापू लागले आहे. अशी परिस्थिती राज्यात असली तरी कोल्हापुरातील छत्रपती घराण्यात एक वेगळीच चर्चा आता रंगू लागली आहे.

युवराज संभाजीराजे छत्रपती (Former MP Sambhaji Raje) यांच्याबद्दल अनेकांना उत्कंठा लागून राहिले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत स्वराज्य पक्षाला बाजूला ठेवले असले तरी माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती आता नव्या भूमिकेतून जनतेसमोर येणार आहेत.

युवराज संभाजी राजे छत्रपती हे वेळात वेळ काढून आणि लोकसभेच्या धावपळीत एका चित्रपटात भूमिका साकारणार आहेत. सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात ते महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. नागराज मंजुळे यांचा खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sambhaji Raje
Panvel news: ठाकरेंच्या ठायी कार्यकर्त्यांच्या भावनांची किंमत कवडीमोल; माजी उपशहरप्रमुखाचा शिवसेनेत प्रवेश

खाशाबा जाधव यांच्यावर आधारित असलेल्या चित्रपटामध्ये कोल्हापूरचे तात्कालीन छत्रपती श्रीमंत शहाजी महाराज यांच्या भूमिकेचा रोल युवराज संभाजीराजे छत्रपती यांना देण्यात येणार आहे. खाशाबा जाधव यांना आर्थिक मदत श्रीमंत शहाजी महाराज यांनी दिल्याच्या नोंदी आढळतात. ही गोष्ट चित्रपटातून समोर आणण्यासाठी युवराज संभाजीराजे छत्रपती यांना श्रीमंत शहाजी महाराजांची भूमिका करण्याची ऑफर आहे. याबाबत नुकतीच संभाजीराजे छत्रपती यांनी माहिती दिली आहे.

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी संभाजीराजांना काही दिवसांपूर्वी नागराज मंजुळे यांनी फोन केला होता. ते लवकरच खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. खाशाबा जाधव यांना त्यावेळी आमचे आजोबा शहाजी महाराजांनी आर्थिक मदत केली होती. त्यामुळे शहाजी महाराजांची भूमिका तुम्ही करू शकता का? असं त्यांनी विचारणा केल्याचे सांगितले.

चेहरापट्टी, आवाज, माझं नाक यात त्यांना साम्य जाणवलं. त्यामुळे ही भूमिका मी करावी असा त्यांचा आग्रह होता. त्यानुसार मी आमचे आजोबा शहाजी महाराजांची भूमिका स्वीकारणार असल्याचे सांगितले. आजपासून कोल्हापुरातील कसबा बावडा येथे असणाऱ्या नवीन राजवाडा येथे या चित्रपटाचे शूटिंग पार पडणार आहे. 16 मार्चला मुख्य चित्रीकरण केले जाणार असल्याची माहिती आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com