Khatav Congress News : भाजपच्या निष्क्रीय आमदाराला हरविणार; आमदार गोरेंच्या विरोधात काँग्रेस रान पेटवणार

BJP MLA Jaykumar Gore : दुष्काळी खटाव तालुक्यात भाजपाच्या आमदारांनी कायम दुजाभाव करून सापत्नपणाची वागणूक दिली.
Jaykumar Gore
Jaykumar Gore Sarkarnama
Published on
Updated on

Satara Congress News : राज्यात काही महिन्यांतच विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजणार आहेत. खटाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी तळागाळात पोहोचून या निवडणुकीत माण विधानसभा मतदारसंघाच्या निष्क्रीय भाजप आमदारांना हरविण्याचा निर्धार गुरुवारी (ता.20) खटाव तालुक्यात झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आला.

वडुज (ता. खटाव) येथे फिनिक्स ऑगनायझेशनच्या सभागृहात तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे सदस्य रणजितसिंह देशमुख, प्रदेश प्रतिनिधी राजू मुलाणी, तालुकाध्यक्ष डॉ. संतोष गोडसे, बाजार समितीचे उपसभापती विजयकुमार शिंदे, माण विधानसभा काँग्रेसचे प्रमुख डॉ. महेश गुरव, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनिल भिसे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

रणजितसिंह देशमुख म्हणाले की, खटाव तालुक्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपने आर्थिक रणनीतीचा वापर करून लोकशाहीतील निवडणूक प्रकिया वेगळ्या वळणावर नेली. मात्र, खटाव तालुक्यातील काँग्रेस(Congress) विचारसरणीचे मतदार व पदाधिकारी किंचितही विचलित झाले नाहीत. जातीवादी पक्षाला राज्यातील जनतेने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट नाकारले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला (BJP) संपुष्टात आणण्याची धमक फक्त राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येच आहे. त्यामुळे या क्षणापासून भाजपविरोधी भूमिका कणखरपणे मांडण्याची जबाबदारी तुमची आमची आहे. माढा लोकसभा निवडणूकीत भाजप उमेदवाराचा प्रचंड मतांनी पराभव हीच विधानसभा निवडणूकीची नांदी ठरेल, असा आत्मविश्वासही देशमुख यांनी व्यक्त केला.

Jaykumar Gore
Arvind Kejriwal Bail : मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांना अखेर जामीन; न्यायालयात नेमकं काय घडलं?

उपसभापती विजयकुमार शिंदे म्हणाले, दुष्काळी खटाव तालुक्यात भाजपाच्या आमदारांनी कायम दुजाभाव करून सापत्नपणाची वागणूक दिली. शेती पाणी व पिण्याच्या पाण्याबाबत सत्तेचा गैरवापर करत येथील जनतेला तहानलेले ठेवले हे पाप त्यांच्या माथी असून निसर्गानेच येथील जनतेची व शेतकऱ्यांची तहान भागवली आहे.

तालुक्यातील जनतेला सर्व ज्ञात असून विधानसभा निवडणुकीची जनता आतुरतेने वाट पाहत आहे. प्रशासकीय यंत्रणेवर नाहक दबाव टाकत तालुक्याला जनतेला वेठीस धरले. मात्र आता जनता सुज्ञ झाली आहे. यापुढे त्यांच्या कोणत्याच भुलभुलैयाला आणि नौटंकीला थारा देणार नाहीत.

Jaykumar Gore
Nilesh Lanke News : नगरमध्ये मोठं घडणार, लंकेंच्या प्रचारसभांचे विखेंनी मागवले व्हिडिओ; पुराव्यांची जुळवाजुळव?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com