Crime News : धक्कादायक! नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा अपहरणाचा प्रयत्न; साधूच्या वेशात आले अन्...

Panchgani Police Santosh Kamble Kidnap Attempt : ऐन थंडीत सातारा जिल्ह्यातील पाचगणीमधील राजकीय वातावरण पेटले आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचे एकच खळबळ उडाली आहे.
Police investigate the spot after an abduction attempt on Santosh Kamble in Panchgani.
Police investigate the spot after an abduction attempt on Santosh Kamble in Panchgani.sarkarnama
Published on
Updated on

Panchgani News : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कालपासून विरोधी उमेदवारांकडून अर्ज मागे घ्यावेत यासाठी राजकीय पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातच गुरुवारी सकाळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचे साधूच्या वेशात येऊन एका टोळीकडून अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना पाचगणीमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाचगणी पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यातील पाचगणी नगरपंचायतीसाठी नगराध्यक्षपचे उमेदवार संतोष प्रभू कांबळे यांचे नागा साधूच्या वेशात आलेल्या काही जणांकडून अपहरणाचा प्रयत्न केल्याने दंड हवेचे ठिकाण असलेल्या पाचगणीत राजकीय वातावरण पेटले आहे. कांबळे यांनी आपल्या अपहरणाच्या प्रयत्ना संबंधी पोलिसांमध्ये तक्रार केली आहे.

कांबळे यांनी सांगितले की, ते घरात वरच्या मजल्यावर झोपले असताना त्यांना घराबाहेर कोणीतरी बोलत असल्याच्या आवाज आला. त्यामुळे त्यांनी बाहेर जाऊन पाहिले तर अंगाला भस्म लावलेले दोघे जण त्यांच्या घरी येत होते. तर, गाडीत काही जण बसून बोलत होते. त्यामुळे त्यांच्यावर आपल्याला संशय आला.

Police investigate the spot after an abduction attempt on Santosh Kamble in Panchgani.
Uddhav Thackeray : पालघर साधू हत्याकांडांतील आरोपांमुळे काशिनाथ चौधरींच्या पक्ष प्रवेशाला स्थगिती, पण ठाकरेंनी 'तो' प्रश्न उपस्थित करत भाजपची केली मोठी कोंडी

अंगावर भस्म लावलेल्या, साधूच्या वेशात दोघा जणांनी संतोष कांबळे यांना तुम्ही निवडणुकीसाठी उभे आहात तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी महाराज खाली गाडी बसले आहेत तुम्ही त्यांचा आशीर्वाद घ्यायला चला, असे सांगितले. मात्र, संतोष कांबळे यांना संशय आल्याने त्यांनी येण्यास नकार दिला. तेव्हा त्या दोन साधूंनी संतोष यांच्याशी झपाटपट करून त्यांना गाडीपर्यंत ओढत नेले.दरम्यान, धक्काबुक्कीमध्ये त्या गाडीची काच देखील फुटली. या झटापटीनंतर त्या साधूंनी त्या गाडीतून पळ काढला.

पोलिस अ‍ॅक्शनमध्ये...

अपहरणाच्या प्रयत्नाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळावरील सीसीटिव्ही, टोलनाक्यावरील सीसीटीव्ह चेक केले. तसेच लाॅज, हाॅटेलमधील नोंदी तपासत संबंधितांची माहिती मिळवण्याच्या हालचाली केल्या.

सतर्क राहण्याचे आवाहन

पोलिस अधिकारी पवार यांनी सांगितले की, उमेदवाराला घाबरवणे, दबाव टाकणे यासाठी हा प्रयत्न होता का या अँगलने देखील तपास केला जाणार आहे. दरम्यान, उमेदवारांवर कोणी दबाव टाकत असेल, साधूच्या वेशात आशीर्वाद देण्यासाठी येत असेल मानसिक दबाव टाकत असेल तर उमेदवारांनी न घाबरता पोलिसांकडे तक्रार करावी. नागरिकांनी अथवा उमेदवारांनी अशा स्वरूपाच्या अनोळखी साधूंपासून सावध राहावे.

Police investigate the spot after an abduction attempt on Santosh Kamble in Panchgani.
Eknath Shinde Vs BJP : तक्रार घेऊन गेलेल्या एकनाथ शिंदेंना अमित शाहांनी उलटं सुनावलं? म्हणाले, 'तुम्हाला लोकं...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com