Akluj Bazar Samiti Result : जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा; मोहिते पाटलांविरुद्ध पुन्हा लढण्याची के.के.पाटलांची तयारी

Vijaysinh Mohite–Patil : अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्ताधारी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पॅनेलचा 18 पैकी 17 जागांवर विजय
Vijaysingh Mohite Patil, K. K. Patil
Vijaysingh Mohite Patil, K. K. PatilSarkarnama

Akluj Bazar Samiti News : अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्ताधारी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पॅनेलचा 18 पैकी 17 जागांवर दणदणीत विजय मिळविला आहे. मोहिते पाटील यांच्या विरोधी गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उत्तम जानकर हे विजयी झाले. तर डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मातोश्री पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी गटाने आगामी काळात मोहिते पाटलांविरुद्धचा लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

Vijaysingh Mohite Patil, K. K. Patil
Shivsena rebel : ठाकरेंना सोडलेल्या आमदार चिमणराव पाटील यांना मतदारांचा दणका!

बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite–Patil) यांच्या गटाविरुद्ध माळशिरस तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व जुन्या भाजपमधील मातब्बर मंडळी एकत्र आली होती. त्यांनी माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडीची स्थापना केली. या आघाडीचे नेतृत्व बाजार समितीचे माजी सभापती फत्तेसिंग माने पाटील, काँग्रेस (Congress) जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील (Dhavalsinh Mohite-Patil) यांच्याकडे सोपवले होते.

या आघाडीच्या वतीने डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मातोश्री पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील या स्वतः ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण गटातून आणि सहकारी संस्था म्हणजे सोसायटी मतदारसंघातून निवडणुकीस उभा होत्या. त्यांना सहकारी संस्थांमध्ये 326 तर ग्रामपंचायत मतदार संघातून 87 मतांनी पराभव स्विकारावा लागला.

Vijaysingh Mohite Patil, K. K. Patil
Bhokar APMC Result : अशोक चव्हाणांनी भाजप, बीआरएसला रोखत बाजी मारली..

माजी मंत्री. कै. प्रतापसिंह मोहिते पाटील हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे सख्खे बंधू होते. त्यांच्या करिश्मामुळे विरोधी गटातून पद्मजादेवी मोहिते पाटील व उत्तम जानकर (Uttam Jankar) हे दोघे तरी नक्कीच विजय होतील अपेक्षा होती. मात्र, सत्ताधाऱ्यांनी 'क्रॉस वोटिंग' न होण्याची दक्षता घेतल्यामुळे श्रीमती पद्मजादेवी मोहिते पाटील यांचा पराभव झाला. या पार्श्वभूमिवर शेतकरी विकास आघाडीचे नेते के. के. पाटील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी आगामी काळात विजयसिंह मोहिते पाटील यांच्याविरोधातील लढा तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Vijaysingh Mohite Patil, K. K. Patil
Akluj Bazar Samiti Result : काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या मातोश्रींचा दोन्ही गटात धक्कादायक पराभव

के. के. पाटील (K. K. Patil) म्हणाले, "अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरोधात यावेळी आम्ही सगळे जण मोठ्या ताकदीने लढलो.आम्ही लढलो आणि पराभूत झालो. पराभव आम्हाला मान्य आहे. ही राजकीय लिटमस टेस्ट होती. ही सुरुवात आहे. वर्षानुवर्षे सत्ता उपभोगणाऱ्या लोकांना निश्चितच या निवडणुकीत मेटाकुटीला आणले होते. धनाशक्तीच्या प्रचंड वापरापुढे आमची ताकद कमी पडली. निवडणूक अटीतटीची आणि प्रतिष्ठेची होती हे नक्की.या पराभवाने आम्ही खचलो नाहीच. मात्र, आगामी काळात ताकदीने लढण्यासाठी बरच काही शिकलो आहोत हे खुल्या दिलाने व्यक्त करतो. हार जीत ही लपंडाव रे..जिद्द राहूदे मनी झुंझायची पुन्हा !!"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com