

Kolhapur APMC : कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपच्या नाना कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. ते माजी आमदार, भाजप नेते संजय घाटगे यांच्या गटातील संचालक आहेत. राष्ट्रवादीचे संचालक सूर्यकांत पाटील यांच्या मुदतपूर्व राजीनाम्यानंतर बाजार समितीचे सभापतीपद रिक्त झाले होते.
रिक्त झालेल्या सभापती निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी (दि. 10) बाजार समितीच्या प्रधान कार्यालयात पार पडली. सहकार विभागाच्या शहर उपनिबंधक प्रिया दळणर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया झाली. अर्जास शेखर देसाई यांनी अनुमोदन दिले. कांबळे यांना सभापतीपद देऊन मुश्रीफ यांनी अनेक राजकीय गणित साधली असल्याचे दिसून येते.
पुन्हा कागल :
कोल्हापूर जिल्हा बँकेचे हसन मुश्रीफ स्वतः अध्यक्ष आहेत. हसन मुश्रीफ यांचेच चिरंजीव नवीद मुश्रीफ हे गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष आहेत. जिल्हा परिषेदेच अध्यक्षपद तालुक्यातील सेनापती कापशीच्या सदस्या शिल्पा खोत यांच्याकडे आहे. आता कांबळे यांच्या निवडीनंतर बाजार समितीचे सभापतीपदही कागल तालुक्याकडेच घेतले आहे.
संजय घाटगेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न :
माजी आमदार संजय घाटगे भाजपमध्ये स्थिरस्थावर झाले आहेत. पण मुश्रीफ यांच्यासोबत त्यांची चांगली मैत्री आहे. जिल्ह्यातील निवडणुकीत त्यांची आघाडी आहे. घाटगे यांना मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेतून कर्जही मंजूर झाले होते. पण मध्यंतरी कागल नगरपालिका निवडणुकीवेळी मात्र मुश्रीफ आणि संजय घाटगे यांच्यात काहीसे अंतर पडले होते.
मुश्रीफ यांनी समरजीत घाटगे यांच्याशी युती करताना संजय घाटगे यांना बाजूला ठेवले होते. त्यामुळे संजय घाटगे नाराज झाले होते. आता बाजार समितीत त्यांचे कट्टर समर्थक नाना कांबळे यांना सभापतीपदाची संधी देऊन ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला आहे. सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेखर देसाई आणि काँग्रेसच्या सुयोग वाडकर यांच्यासह काही इच्छुकांनी फिल्डिंग लावली होती.
भाजपचा मान राखला :
मुश्रीफ यांनी कागल नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी समरजीत घाटगे यांच्या समर्थकाला दिली होती. आता घाटगे भाजपवासी झाल्यानंतर त्यांचा गटही भाजपसोबत आला आहे. त्यापाठोपाठ जिल्हा बँकेतही भाजप नेते संजय घाटगे यांना समर्थकाला म्हणजे भाजपलाच सभापतीपद दिले आहे. मुश्रीफ यांनी भाजपला कागलमध्ये दुसरे महत्त्वाचे पद दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.