Kolhapur North Constituency: महाडिकांच्या डावात पाहुणा 'नाना' बाद, सत्यजित कदमांच्या मेहनतीवर पाणी

Satyajeet Kadam : कोल्हापूर महापालिकेत दोनवेळा नगरसेवक असलेले सत्यजित उर्फ नाना कदम यांनी 2014 मध्ये काँग्रेसकडून कोल्हापूर उत्तरमधून लढवली.
Dhananjay Mahadik, Satyajeet Kadam
Dhananjay Mahadik, Satyajeet KadamSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News: गेल्या दहा वर्षापासून कोल्हापूर उत्तरेत सत्यजित कदम यांनी केलेल्या तयारीवर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या उमेदवारीसाठी झालेल्या प्रयत्नांमुळे पाणी फिरले आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार असलेले माजी नगरसेवक सत्यजित कदम हे पै-पाहुण्यांच्या राजकारणाचा बळी ठरल्याची चर्चा आहे.

कोल्हापूर महापालिकेत दोनवेळा नगरसेवक असलेले सत्यजित उर्फ नाना कदम यांनी 2014 मध्ये काँग्रेसकडून कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढवली. कदम हे महाडिक यांचे नातेवाईक आहेत. पण ऐनवेळी महाडिक बंधूंनी 2014 ला कोल्हापूर दक्षिण मधून भाजपकडून अमल महाडिक यांना मैदानात उतरवले.

Dhananjay Mahadik, Satyajeet Kadam
Congress Vs Shivsena : 'तिकडे शिंदेंनी धोका दिला; इकडं प्रणिती अन्‌ सुशीलकुमार शिंदे केसाने गळा कापताहेत'

माजी आमदार महादेवराव महाडिक व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यातील वादाचा फटका कदम यांना बसला. काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही कदम यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर महाडिक बंधूंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सत्यजित कदम हे देखील भाजपमधून कार्यरत झाले.

विधानसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने कदम यांनी कोल्हापूर उत्तर मधून जोरदार तयारी केली. मात्र 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युती झाल्याने ही जागा शिवसेनेला सुटली. त्यामुळे कदम यांना पुन्हा पाच वर्षाची प्रतीक्षा करावी लागली.

Dhananjay Mahadik, Satyajeet Kadam
Rajendra Raut : आमदार राजेंद्र राऊतांना अवघ्या 18 दिवसांत बदलावा लागला निर्णय

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणुकीत कदम यांनी भाजपकडून निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात जाधव यांच्या पत्नी जयश्रीताई जाधव यांनी निवडणूक लढवली. सहानुभूतीची लाट असताना देखील कदम यांनी 80 हजार मते घेतली. 2024 च्या निवडणुकीत भाजप याची दखल घेईल, असा अंदाज त्यांना होता. त्यामुळे सत्यजित कदम यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती.

मात्र गेल्या अडीच वर्षात राज्यातील सत्ता समीकरणे बदलली. त्यातून कोल्हापूर उत्तरची जागा कोणाला यावर जोरदार रस्सीखेच सुरू झाली. शिवसेना आणि भाजपमध्ये जागा मिळवणयासाठी स्पर्धा सुरू झाली. खासदार महाडिक यांचे पुत्र कृष्णराज यांनी या मतदारसंघातून लढण्याची तयारी सुरू केली. त्यातून एकाच घरात एकाच मतदारसंघात दावेदारी सुरू झाल्याने त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांतही चलबिचल सुरू झाली.

महाडिक हे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे भेटायला गेल्यानंतर त्यांनी कदम यांच्याऐवजी कृष्णराज यांच्या उमेदवारीची मागणी केली. त्यामुळे या दोघांमधील वाद वाढला. हा वाद इतका झाला की दोघांच्या भांडणात तिसऱ्याने फायदा घेतला. ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे गेली. आणि पाहुण्यांच्या या राजकारणात कदम यांच्यासारख्यांचा बळी गेला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com