Congress Vs Shivsena : 'तिकडे शिंदेंनी धोका दिला; इकडं प्रणिती अन्‌ सुशीलकुमार शिंदे केसाने गळा कापताहेत'

Solapur South Constituency Issue : सोलापूर दक्षिणची जागा महाविकास आघाडीत शिवसेनेला सुटली असून शिवसेनेकडून अमर पाटील यांना उमेवारी जाहीर झाली आहे, त्यामुळे काँग्रेसने सोलापूर दक्षिण मतदारसंघावरील दावा सोडावा.
Sharad Koli-Praniti Shinde-Sushilkumar Shinde
Sharad Koli-Praniti Shinde-Sushilkumar ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 28 October : सोलापूर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर होताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रचंड आक्रमक झाला आहे. तिकडे एकनाथ शिंदेंनी धोका दिला, इकडे (काँग्रेस) सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे हे सुरुवातीलाच शिवसैनिकांचा गळा कापण्याचा काम करत आहेत, असा हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांनी केला आहे.

सोलापूर दक्षिण मतदारसंघावरून (Solapur South Constituency) महाविकास आघाडीमध्ये टोकाचा विरोध पाहायला मिळत आहे. आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सोलापूर दक्षिणमधून अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

त्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत थेट अकरा ठिकाणी उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला. त्यामुळे ‘सोलापूर दक्षिण’ वरून महाविकास आघाडीत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे. त्यातूनच शिवसेना उपनेते शरद कोळी यांनी काँग्रेसला थेट इशारा दिला आहे.

काँग्रेसला ‘सांगली पॅटर्न’ महागात पडणार आहे. काँग्रेस नेत्यांनी महाविकास आघाडीत बिघाडी होईल असं कुठलंही कृत्य करू नये. सोलापूर दक्षिणची जागा महाविकास आघाडीत शिवसेनेला सुटली असून शिवसेनेकडून अमर पाटील यांना उमेवारी जाहीर झाली आहे, त्यामुळे काँग्रेसने सोलापूर दक्षिण मतदारसंघावरील दावा सोडावा, असे आवाहन शरद कोळी (Sharad Koli) यांनी केले आहे.

Sharad Koli-Praniti Shinde-Sushilkumar Shinde
Sharad Pawar : पवारांनी दिला युगेंद्र पवारांना बारामतीच्या विजयाचा कानमंत्र; ‘गेली 57 वर्षे मी जे करतोय, तेच...’

काँग्रेसने शिवसेनेवर दबावतंत्राचा वापर केला तर याद राखा. शिवसेना कोणालाही भीक घालत नाही. काँग्रेसने सोलापूर दक्षिणला उमेदवारी अर्ज भरला तर सोलापूर जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार आहे, तिथे शिवसेना एबी फॉर्म देऊन उमेदवार उभा करेल, त्यामुळे याचे परिणाम काँग्रेसला भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

कोळी म्हणाले, आमच्यातून 40 गद्दार गेले तरी शिवसेनेला फरक पडला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठीत खंजीर खुपसला. भाजपचा गुण माहिती व्हायला 30 वर्ष लागली. त्यांची औकात त्यांनी दाखवली. आता आम्ही काँग्रेससोबत आलो आहोत. काँग्रेस तर सुरुवातीलाच त्यांचे गुण दाखवत आहे.

Sharad Koli-Praniti Shinde-Sushilkumar Shinde
Rajendra Raut : आमदार राजेंद्र राऊतांना अवघ्या 18 दिवसांत बदलावा लागला निर्णय

तिकडे एकनाथ शिंदेंनी धोका दिला आणि इकडे (काँग्रेस आघाडीत) सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे हे सुरुवातीलाच शिवसैनिकांचा गळा कापण्याचं काम करत आहेत. मात्र, याद राखा आम्ही तुमच्या दबावतंत्राला भिणार नसून आमचा उमेदवार ठरला आहे. त्यामुळे सोलापूर दक्षिण मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अमर पाटील हेच उमेदवार राहतील आणि जिंकूनही येतील, असा दावाही कोळी यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com