Maharashtra Politics : फडणवीस यांच्या नेत्याची हिंदुत्ववादी भूमिका; म्हणाला आम्ही 'ओरिजिनली हिंदू, RSS ने ताकद दिली'

Nitesh Rane On Hindutva : राज्यात महायुतीचे सरकार आले असून मत्स्यव्यवसाय व बंदर, विकास मंत्री नितेश राणे यांचा आक्रमकपणा आणखी वाढला आहे. आता त्यांनी आपल्याला भाजपमुळे हक्काचे व्यासपीठ मिळाल्याचे म्हटलं आहे.
devendra fadnavis
devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg News : राज्यात महायुतीचे सरकार आले असून मत्स्यव्यवसाय व बंदर, विकास मंत्री नितेश राणे आणखीन आक्रमक झाले आहेत. मध्यंतरी त्यांनी एका कार्यक्रमात थेट मुस्लिम समाजाला टार्गेट करत चेतावणी दिली होती. तर आता पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर विरोधी सरपंचांना निधी देणार नाही, निधी हवा असेल तर भाजपमध्ये या असे वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या अशा वक्तव्यांमुळे ते सध्या चांगेलच चर्चेत आले आहेत. अशातच त्यांनी आम्ही 'ओरिजिनली हिंदुत्ववादी असून RSS ताकद दिली तर भाजपने व्यासपीठ दिले आहे. यामुळे कोणत्याही पदापेक्षा हिंदूत्व आणि हिंदू म्हणून काम करणे माझे सर्वोच्च कर्तव्य असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

यावेळी राणे यांनी, आम्ही मुळात हिंदुत्ववादी असून आता आम्हाला भाजपमुळे हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. तर सध्याची परिस्थिती पाहता कडवट हिंदुत्ववादी भूमिकाच घ्यावी लागणार आहे. ही भूमिका माझ्या समाजासाठी, हिंदू धर्मासाठी गरजेची असल्याचे राणे यांनी म्हटलं आहे.

सध्या नितेश राणे यांची हिंदुत्ववादी नेतृत्व अशी ओळख राणे झाली असून आक्रमक हिंदुत्व ही आज गरज असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच नारायण राणे हे देखील कट्टर हिंदुत्ववादी असून त्यांनी याआधी अनेकदा कडवट भूमिका घेतली आहे. पण त्याकाळी सोशल मिडिया नव्हता, इलेक्ट्रॉनिक व इतर माध्यमेही प्रभावी नव्हती, यामुळेच नारायण राणे लोकांपर्यंत पोहचू शकले नाहीत.

devendra fadnavis
Nitesh Rane : ‘..म्हणून मी Sanjay Raut यांचं पूर्ण नाव घेतो’ Nitesh Rane यांची सडकून टीका |

राणे यांनी 39 वर्षे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम केले. शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व जहाल आणि अगदी टोकाचे होते. त्याचा प्रभाव त्यांच्यावरही पडला. यामुळे आम्ही 'ओरिजिनली' हिंदुत्ववादी आहोत."

devendra fadnavis
Nitesh Rane challenge to Congress : राजीनामे द्या अन् बॅलेटवर निवडून येऊन दाखवा; नितेश राणेंचे काँग्रेसला खुले आव्हान

आमच्या वाट्याला सतत राजकीय संघर्ष आले असून आमची हिंदुत्वाची भूमिका आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेल्या ताकदीवरच इथपर्यंतचा प्रवास केला आहे. माझ्या वडिलांच्या आयुष्यात बाळासाहेब ठाकरे यांनी जी भूमिका निभावली ती भूमिका आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्यासाठी निभावत असल्याचे निलेश राणे यांनी म्हटलं आहे. फडणवीस यांनी राजकीय कार्यकर्ता म्हणून मला घडवले, संधी दिली, विश्वास ठेवला आणि भाजपचे दरवाजे खुले केल्याचेही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com