Kolhapur Politics News : मुश्रीफांनी 'हद्द' केली; कृती समितीचा संताप

Hasan Mushrif On Kolhapur : मंत्री मुश्रीफांचा पुनरुच्चार, 6 गावांचा महापालिकेत समावेश करणार...
Kolhapur Politics News :
Kolhapur Politics News : Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : शहरालगत असलेली सहा गावे पहिल्या टप्प्यात घेऊन लवकरच हद्दवाढ करण्यात येईल. त्याचा आदेश काढण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. या आदेशाची घोषणा त्यांच्याकडून होईल, असे सांगत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी हद्दवाढीबाबत पुनरुच्चार केला. पुनरुचार करताच हद्दवाढ विरोधी कृती समिती संतापली असून आज त्याबाबत बैठक घेणार आहेत. बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. महापालिका आढावा बैठकीत ते बोलत होते. (Latest Marathi News)

Kolhapur Politics News :
Nanded NCP News : अजितदादांकडून नांदेडमध्ये कार्यकर्त्यांना बळ, सहाजणांची `डीपीडीसी`वर नियुक्ती..

मुश्रीफ म्हणाले, "महापालिका रस्ते, पाणी, बस आदी सुविधा या शहराजवळील सहा गावांना देत आहे. त्यामुळे हद्दवाढ झाली, तरच त्यांचा महापालिकेवर भार पडणार नाही. या गावांशिवाय हद्दवाढीत प्रस्तावित असलेल्या इतर गावांबाबत निर्णय लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर होईल. हद्दवाढ होईपर्यंत शासनाकडून जादा निधी आणून शहर विकासासाठी प्रयत्न करणार आहे."

"काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम पूर्ण झाले आहे. दोन उपसा पंप सुरू आहेत. चंबुखडी येथे पाईपलाईनच्या क्रॉस कनेक्शनचे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्ण शहराला थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जाईल. शहरातील सर्व ठिकाणी एकसारखे आणि योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी आयआयटी मुंबईच्या माध्यमातून सर्व्हे केला आहे. या पाईपलाईनमुळे 176 एमएलडी पाणी उपसा होऊन त्याने सांडपाणीही वाढणार आहे.

Kolhapur Politics News :
Satara NCP News : देवाला देवाच्या जागी ठेऊया... वळसे-पाटलांचा राऊतांना सल्ला

"40 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करावी लागणार आहे. अमृत योजना टप्पा दोनच्या माध्यमातून ३३६ कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यातून पाच एसटीपी प्रकल्प प्रस्तावित आहेत. ‘अमृत’ एक, दोन पूर्ण झाल्यानंतर पंचगंगा नदी शंभर टक्के प्रदूषणमुक्त होईल. या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. सर्व कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण केली जातील, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

क्षीरसागरांशी चर्चा करू!

शंभर कोटींच्या निधीतून होणारे रस्त्यांच्या कामाचे उद्‍घाटन आणि थेट पाईपलाईनच्या कामाचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्याची राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची इच्छा आहे. या रस्त्यांच्या कामाची ऑर्डर निघाली आहे. खड्डेमय, खराब रस्त्यांबाबत नागरिकांमध्ये संतप्त भावना आहेत. त्यामुळे रस्त्यांच्या कामाची सुरुवात लवकर होणे आवश्‍यक आहे. थेट पाईपलाईनचे पाणी अद्याप संपूर्ण शहराला मिळत नाही. ते लवकरच मिळेल. त्यानंतर रस्त्यांच्या कामाचे उद्‍घाटन आणि थेट पाईपलाईनचे लोकार्पणाचा संयुक्त कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घेण्याबाबत क्षीरसागर यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

हद्दवाढविरोधी समितीची आज बैठक

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सहा गावे घेऊन शहराची हद्दवाढ करणार असल्याचे आज जाहीर केले. त्यावर हद्दवाढीविरोधी कृती समितीने पुढील लढ्याची दिशा ठरविण्यासाठी आज (ता. ३०) सकाळी ११ वाजता हॉटेल पॅव्हेलियनमध्ये बैठक आयोजित केली आहे. समितीने म्हटले आहे की, कळंबा, पाचगाव, मोरेवाडी, उचगाव, कंदलगाव, सरनोबतवाडी गावांचा हद्दवाढीत समावेश होणार आहे.

त्याचबरोबर दोन एमआयडीसी आणि ४१ गावांच्या हद्दवाढीबाबत लोकसभा निवडणुकीनंतर चर्चा होणार असल्याचे समजले आहे. सध्या हद्दवाढ विरुद्ध ज्या वीस गावांची एकी आहे, ती फोडण्याचा हा प्रयत्न आहे. हद्दवाढीला विरोध करण्यासाठी बैठकीत चर्चा करून पुढील लढ्याची दिशा ठरविली जाणार आहे. बैठकीला संबंधित गावांमधील सर्व सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे.

झूम प्रकल्पातील कचऱ्याचे बायोमायनिंग -

राष्ट्रीय स्वच्छ हवा योजनेतून शहराला 16 कोटींचा निधी मिळाला आहे. दाभोळकर कॉर्नर येथे प्रायोगिक तत्त्वावर हवा स्वच्छ करणारी यंत्रणा बसविली आहे. झूम प्रकल्पातील अनेक वर्ष पडून असलेल्या एक लाख 67 टन कचऱ्याचे बायोमायनिंग केले जाणार आहे. तेथे दररोज संकलित होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नवीन प्रकल्प उभारला जाणार आहे. महिन्याभरात ‘झूम’मधील कचऱ्याचा डोंगर दूर होईल. कचरा उठावासाठी आणखी 30 टिप्पर खरेदी केले जातील, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

या गावांचा समावेश शक्य -

दरम्यान, हद्दवाढीत कळंबा, पाचगाव, मोरेवाडी, उचगाव, कंदलगाव, सरनोबतवाडी या गावांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com