
Kolhapur News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा झाली असून जिल्ह्यात महायुती तयारीला लागली आहे. महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने तगड्यां स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांचा शोध सुरू केला आहे. तर महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी पुढे आपल्या स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांना रोखण्याचे आव्हान पेलावं लागणार आहे. सध्या अशीच तारेवरची कसरत काँग्रेस नेते तथा आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांना करावी लागत आहे. यासाठी त्यांनी आखलेल्या डिनर डिप्लोसी यश आले आहे.
विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये बंड आणि नाराजी समोर आली होती. ती अद्यापही कायम असून काँग्रेसच्या डझनभर माजी नगरसेवकांनी काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. तर हे माजी नगरसेवक शिंदे गट, भाजप किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या शक्यतेनंतर सतेज पाटील यांनी डिनर डिप्लोसी आखत माजी नगरसेवकांची बैठक घेतली. यावेळी काही नगरसेवक गैर हजर होते. तर 34 माजी नगरसेवकांनी बैठकीला हजेरी लावली. यामुळे हजर असणारे सर्वच्या सर्व नगरसेवक सतेज पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे कळत आहे. तसा पण त्या नगरसेवकांनी बोलूनही दाखवला आहे.
मात्र यावेळी काही महत्वाचे चेहरे गैर हजर राहिल्याने वेगवेगळ्या चर्चांना उत आला आहे. काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख, माजी महापौर निलोफर आजरेकर, दिलाप पवार यांच्यासह आणखी दोन माजी नगरसेवकांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. तसेच याच बैठकीला माजी महापौर प्रतिभा नाईकनवरे व माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे यांनी देखील दांडी मारली. यामुळे हे माजी नगरसेवक काँग्रेसला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
एकीकडे 34 माजी नगरसेवकांनी एकमुखाने काँग्रेस सोबत राहण्याचा निर्धार केला असून यामुळे सतेज पाटील यांच्यासमोरील चिंता काही अंशी कमी झाली आहे. पण शारंगधर देशमुख, निलोफर आजरेकर, दिलाप पवार यांच्यासह माजी नगरसेवक नाईकनवरे दाम्पत्याने बैठकीला दांडी मारल्याने पाटील यांच्यासमोर नवे आव्हान उभे असणार आहे. आता सतेज पाटील हे आवाहन कसे पेलटतात? ते शारंगधर देशमुख, दोन माजी माजी महापौरांसह इतर नाराजांची समजूत कशी काढतात हेच पाहावं लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.