KDC BANK: हसन मुश्रीफांच्या राजीनाम्यानंतर अध्यक्ष कोण होणार? तीन पाटलांची नावे चर्चेत

Who Will Be the Next KDCC Bank Chairman: हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्यानंतर बँकेच्या अध्यक्षपदावर कोणाला संधी मिळणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या सर्व प्रक्रियेत आमदार विनय कोरे यांचीही भूमिका महत्त्‍वाची ठरणार असल्याचे सांगण्यात येते.
Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

📝 3-पॉईंट सारांश

  1. हसन मुश्रीफ यांचा संभाव्य राजीनामा चर्चेत: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्याने आगामी नेतृत्वावर चर्चा रंगली आहे.

  2. सतेज पाटील, ए. वाय. पाटील आणि राजेश पाटील यांची नावे चर्चेत: अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीशी संबंधित ए. वाय. पाटील आणि दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे पुत्र राजेश पाटील यांची दावेदारी मानली जात आहे.

  3. सर्वपक्षीय बँकेतील सत्तासंघर्ष: अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थानिक नेत्यांना सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू असून, जिल्हा बँकेतील नेतृत्व बदल याच रणनीतीचा भाग असल्याची शक्यता आहे.

Kolhapur News: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे वक्तव्य वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात केल्यानंतर जिल्हा बँकेच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. याला मुहूर्त केव्हाचा असेल याबाबतचा निर्णय त्यांनी संचालक मंडळावर सोडला आहे. खरोखरच ते राजीनामा देणार काय, याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत. तत्पूर्वी सर्वपक्षीय सत्ता असलेल्या जिल्हा बँकेत मुश्रीफ यांनी राजीनामा दिल्यानंतर कोण अध्यक्ष होणार? याची चर्चा अधिक रंगली आहे.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी जिल्हा बॅंकेत सर्वपक्षीय सत्ता आहे. तेथे गट-तट बाजूला ठेवून आतापर्यंत तरी काम सुरू आहे. जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाची धुरा सध्या मंत्री मुश्रीफ यांच्याकडे आहे. यापूर्वी कागलमध्ये केलेल्या राजीनाम्याच्या वक्तव्याबाबत कोणी फारसे गांभीर्याने घेतले नाही. त्यानंतर पुन्हा एकदा भाष्य करून मुश्रीफ राजीनाम्यावर ठाम असल्याचे दिसून आले. त्यांच्या राजीनाम्यानंतर बँकेच्या अध्यक्षपदावर कोणाला संधी मिळणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. आमदार सतेज पाटील की ए. वाय. पाटील यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे.

तोट्यात गेलेल्या बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यात मुश्रीफ यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे बॅंकेत तितक्या ताकदीची व्यक्ती अध्यक्ष व्हावी, यासाठी आमदार सतेज पाटील यांच्याकडे हे पद जाण्याची शक्यता आहे. मंत्री मुश्रीफ यांना अध्यक्षपद देण्यापूर्वी त्या ठिकाणी कॉंग्रेसचे तत्कालीन आमदार पी. एन. पाटील हे इच्छुक होते. त्यांच्याकडेच बॅंकेची धुरा द्यायची होती.

मात्र, मुश्रीफ यांनी हे पद घेतले. त्यामुळे आता अध्यक्षपद काँग्रेसकडे गेल्यास सतेज पाटील मुख्य दावेदार ठरतील. तरीही मंत्री मुश्रीफ यांच्याकडून ए. वाय. पाटील यांचेही नाव पुढे येण्याची दाट शक्यता आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात घेण्यासाठीहीसुद्धा ही खेळी असण्याची शक्यता आहे. या सर्व प्रक्रियेत आमदार विनय कोरे यांचीही भूमिका महत्त्‍वाची ठरणार असल्याचे सांगण्यात येते.

Hasan Mushrif
Mahesh Landge: भाजपच्या पैलवान आमदाराचा काय आहे फिटनेस फंडा?

मंत्री मुश्रीफ यांना अध्यक्षपद देण्यापूर्वी त्या ठिकाणी कॉंग्रेसचे तत्कालीन आमदार पी. एन. पाटील हे इच्छुक होते. जिल्हा बँकेचे अध्यक्षपदावर त्यांच्या नावाची देखील चर्चा होते. सध्याची परिस्थिती पाहता आमदार पी. एन पाटील यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र राजेश पाटील यांना जिल्हा बँकेचे संचालक म्हणून घेण्यात आले.

राहुल पाटील आणि राजेश पाटील यांना राष्ट्रवादीत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण तुमच्या वडिलांप्रमाणे पाठीशी राहू, असा शब्द दिल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे राजेश पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर त्यांना देखील जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर बसवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

4 FAQs with One-Line Answers:

  1. प्रश्न: हसन मुश्रीफ यांनी कोणत्या पदावरून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली?
    उत्तर: त्यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून राजीनाम्याचे संकेत दिले आहेत.

  2. प्रश्न: त्यांच्या उत्तराधिकारी म्हणून कोणाची नावे चर्चेत आहेत?
    उत्तर: सतेज पाटील, ए. वाय. पाटील आणि राजेश पाटील यांची नावे चर्चेत आहेत.

  3. प्रश्न: राजेश पाटील यांचा राजकीय पाठिंबा कोणाकडून आहे?
    उत्तर: अजित पवार यांनी त्यांच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले आहे.

  4. प्रश्न: जिल्हा बँकेत कोणत्या पक्षांची सत्ता आहे?
    उत्तर: जिल्हा बँकेत सध्या सर्वपक्षीय सत्ता आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com