Border Dispute : शिंदे गटाच्या नेत्याचा गनिमी कावा; पोलिसांना हुलकावणी देत बेळगावात पोहचले पण...

Maharashtra-Karnataka Dispute : शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची कर्नाटक पोलिसांकडून धरपकड
Maharashtra Karnatak Dispute
Maharashtra Karnatak Dispute Sarkarnama
Published on
Updated on

संभाजी थोरात

Maharashtra-Karnataka Dispute : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला आहे. त्यामुळे दोन्ही राज्याच्या सीमाभागात अद्यापही तणाव आहे. त्यातच आज कोल्हापुरातील शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बेळगावमध्ये दाखल झाले होते. मात्र त्यानंतर त्यांची कर्नाटक पोलिसांकडून धरपकड करण्यात आल्याने बेळगावमध्ये काही वेळ तणाव निर्माण झाला.

शिंदे गटाचे कोल्हापूर (Kolhapur) जिल्हाप्रमुख राजेखान जमादार हे आज आपल्या कार्यकर्त्यांसह गनिमी काव्याने बेळगावमध्ये दाखल झाले. मात्र ते बेळगावात दाखल होताच कर्नाटक पोलिसांनी त्यांना लगेच अटक केली. यावेळी राजेखान जमादार यांच्यासह त्यांच्या बरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे पुन्हा सीमावादाचा प्रश्न पेटण्याची चिन्ह आहेत.

Maharashtra Karnatak Dispute
Winter Session News : शिंदे गटाच्या खासदारासाठी अजित पवारांनी विधानसभेत उठवला आवाज

तर महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्यात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीचे (NCP) नेते हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वात मविआचे नेते बेळगावात जाणार होते. मात्र त्या आधीच एकीकरण समितीच्या बेळगावामधील (Belgaum) महामेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली.

त्यामुळे हा बेळगावमधला महामेळावा रद्द करण्यात आला. तर आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांना देखील बेळगावमध्ये अडवत अटक करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटल्याची चिन्ह आहेत.

Maharashtra Karnatak Dispute
Winter Session : नागपूर अधिवेशनात शिंदे-फडणवीसांचा मोठा डाव; तब्बल 'एवढी' विधेयकं आणणार

दरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेऊन यावर चर्चा देखील केली होती.

यानंतर हा सीमाप्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत कोणतेही राज्य सीमाप्रश्नाबाबत कसलाही दावा करणार नाही. दोन्ही राज्यांकडून शांतता राखली जाईल. दोन्ही राज्यातील एकमेकांच्या भाषिकांचा उपद्रव होणार नाही, याची काळजी घेण्यात घ्यावी, अशी अपेक्षा अमित शाह यांनी व्यक्त केली होती. मात्र अमित शाह यांच्या या आदेशानंतर देखील हा वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. त्यामुळे आता यावर केंद्र सरकार काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com