Kolhapur Election Voting : बोगस मतदान झाल्याच्या आरोपावरून कोल्हापूरातील मतदान केंद्रावर गोंधळ!

Kolhapur Lok Sabha Election : कोल्हापूर शहरातील पद्माराजे केंद्रावर शिवसेनेने मतदान रोखले.
Kolhapur Voting News
Kolhapur Voting NewsSarkarnama

Kolhapur Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान आज पार पडत आहे. या टप्प्यात राज्यातील 11 मतदारसंघात मतदान होत आहे. दरम्यान काही मतदारसंघातील मतदान केंद्रांवर गोंधळ, हाणामारीच्याही घटना समोर आल्या आहेत. कोल्हापूरमधील एका मतदान केंद्रावरही बोगस मतदान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्यावरून तेथील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ पाठोपाठ कोल्हापूर मतदारसंघात एका केंद्रावर गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. या ठिकाणी बोगस मतदान होत असल्याच्या आरोपावरून वाद उफाळला आहे.(Kolhapur Election Voting)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Kolhapur Voting News
Hatkanangale Lok Sabha Constituency : हातकणंगले मतदारसंघात कार्यकर्ते भिडले, दोन गटात हाणामारी, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मतदान सुरळीत !

परिणामी कोल्हापूर शहरातील पद्माराजे केंद्रावर शिवसेनेने मतदान रोखले होते. पोलिसांना पाचारण केले गेले आणि मतदान थांबवण्याची मागणी केली. मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याचा आरोप यावेळी केला गेला. यावेळी शिवसैनिक आणि महाविकास आघाडी कार्यकर्त्यांमध्ये मतदान केंद्रावर तणाव निर्माण झाल्याचे दिसून आले.

याशिवाय कोल्हापूरातच एका मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगेत उभा राहिलेल्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची दु:खद घटनाही घडली आहे. कोल्हापूरच्या उत्तरपेठेतील रमाबाई आंबेडकर प्रशालेच्या मतदान केंद्रावर ही घटना घडली.

Kolhapur Voting News
Madha Lok Sabha Election : सांगोल्यात देशमुख, पाटलांचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांना केले रक्तबंबाळ

याचबरोबर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या वाळवा तालुक्यातील साखराळे गावातील मतदान केंद्रावर जोरदार राडा झाला. या मतदारसंघातून महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविणारे उमेदवार धैर्यशील माने यांचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या कार्यकर्त्यांत हा राडा झाला. परिणामी या मतदान केंद्रातील मतदान काही काळासाठी बंद करावे लागले होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com