
Kolhapur Politics : जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मतदारसंघाची रचना झाल्यानंतर भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना या ठिकाणी रंगण्याची शक्यता आहे. त्याचे संकेत काही दिवसांपूर्वी झालेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या आंदोलनातून समोर आले आहेत. गडहिंग्लज तालुका कागल आणि चंदगड विधानसभा मतदारसंघात विभागल्याने त्याचा सर्वाधिक फायदा भाजपला होणार आहे.
जिल्हा परिषदेचे सात गटांपैकी पाच गट हे चंदगड विधानसभा मतदारसंघात, एक गीजवणे कागल विधानसभा तर उर्वरित दोन गडहिंग्लज तालुक्यात आहेत. महायुतीतीलच माजी आमदार आणि विद्यमान आमदार शक्तिपीठ मुद्द्यावरून एकमेकांच्या विरोधात असल्याने यंदाची निवडणूक अधिकच रंगत असणार आहे.
मागील निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेसने नेसरी गटात आघाडी केली मात्र इतर गटात या दोघांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या. तर निवडणुकीनंतर भाजपने राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत हात मिळवली करून पंचायत समितीची सत्ता पहिल्यांदाच काबीज केली होती. पण नंतरच्या काळात भाजपलाच फाट्यावर भारत ताराराणी आघाडीशी जवळी केली आणि सत्ता मिळवली. त्यामुळे यंदा देखील भाजपला या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तालुक्यातील सर्वच पक्ष एकत्र येण्याच्या तयारीत आहेत.
प्रमुख कारण म्हणजे शक्तीपीठ महामार्ग हा आपल्या मतदारसंघातून यावा, अशी मागणी भाजपचे सहयोगी सदस्य आमदार शिवाजीराव पाटील यांनी केली आहे. या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात महायुतीतीलच राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार राजेश पाटील यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याचेच पडसाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमटण्याची शक्यता दाट वर्तवली जाते.
आमदार शिवाजीराव पाटील यांना शह देण्यासाठी माजी आमदार राजेश पाटील एकेकाच्या जुन्या मित्रांना जवळ केल्याचे देखील बोलले जाते. तर दुसरीकडे चंदगड मधील असलेले चार जिल्हा परिषद मतदारसंघ हे भाजप विरुद्ध महाविकास आघाडीच लढेल असे चित्र दिसते. तर कागल विधानसभा मतदारसंघात असणारा गिजवणे या मतदारसंघात राजे विरुद्ध मुश्रीफ गट असा सामना रंगला जाण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.