Gokul News: गोकुळमध्ये वादाचा भडका, ठराव धारकांमध्ये हाणामारी, संस्थाचालकच एकमेकांना भिडले

Gokul milk union clash: गोकुळ'ची निवडणूक होऊ घातली आहे. संस्थेच्या ठरावाची मलई कोणाला मिळणार याकडे जिल्ह्यातील सर्वच संस्थांच्या सभासदांचे लक्ष वेधलेले असते. या पार्श्वभूमीवर ठरावाचा मुद्दा सभेच्या केंद्रस्थानी आला.
Gokul Mahasangh
Gokul MahasanghSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघातील नेत्यांमधील इर्षा आता ठराव धारकांपर्यंत पोचले आहे. कोल्हापुरातील गोकुळ दूध (Gokul Dudh Mahasangh) संघाची निवडणूक पुढच्या वर्षी होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठराव कोणाला द्यायचा यावरून संस्थाचालकच एकमेकांना भिडले आहेत. निवडणुकीत दूध संस्थेसाठी ठराव कोणाच्या नावावरून द्यायचा यासाठी आता दूध संस्थांमध्ये चक्क हाणामारी होऊ लागल्याचे चित्र आहे.

पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या धर्मराज दूध संस्थेतील ठराव लिलाव पद्धतीने देण्याची मागणी करत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी झाली. सत्ताधारी आणि विरोधक यांचे समर्थक एकमेकांवर धावून गेल्यामुळे संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा चांगलीच वादग्रस्त ठरली आहे.

दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार ठराव धारकाला असतो.या ठराव भारताला चांगलाच भाव असतो. त्यामुळे हा संस्थेचा ठराव नेमका कोणाच्या नावावर करायचा? यावरून दूध संस्थेमध्ये झालेल्या या राड्याची चांगलीच चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. यंदा या ठराव धारकांना लाखोच्या घरात बोली आल्याने ठराव धारकांना महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवाय गोकुळ दूध संघाच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीची (Election) एक झलकच या निमित्ताने बघायला मिळाली.

पन्हाळा तालुक्यातील कळे येथील धर्मराज दूध संस्थेत मालुबाई देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू झाली. सभेच्या सुरुवातीपासूनच वातावरण वादग्रस्त बनले होते. सचिव भगवान देसाई यांनी सभेतील विषय वाचायला सुरुवात केली. त्यावर सभासदांनी प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, तज्ज्ञ संचालक सुभाष मोळे यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला असता अध्यक्ष, सदस्य किंवा सचिव यांनीच उत्तरे द्यावीत, अन्य कोणीही द्यायची नाहीत असे भरत इंजुळकर म्हणाले.

Gokul Mahasangh
Rajura Constituency Dispute: राहुल गांधींचा राजूरा मतदारसंघात 'मतचोरी'चा झाल्याचा गंभीर आरोप; निवडणूक अधिकाऱ्यांची धक्कादायक माहिती

गोकुळ'ची निवडणूक होऊ घातली आहे. संस्थेच्या ठरावाची मलई कोणाला मिळणार याकडे जिल्ह्यातील सर्वच संस्थांच्या सभासदांचे लक्ष वेधलेले असते. या पार्श्वभूमीवर ठरावाचा मुद्दा सभेच्या केंद्रस्थानी आला. गोकुळचा ठराव लिलाव पद्धतीने काढून येणारे पैसे सभासदांना वाटायची मागणी भरत इंजुळकर यांनी केली. एक लाख रुपये आपण स्वतः द्यायला तयार असल्याचे सांगत बोली लावली.

दरम्यान, निवडणूक झाली नाही तर काय करायचे असा प्रतिप्रश्न जितेंद्र देसाई यांनी केला. नाही झाली तरीही ठरावाचे लाख रुपये संस्थेला दिले असे समज.' असे भरत इंजुळकर यांनी सांगितले. पाच लाख दे आणि ठराव तुलाच घे.' असे जितेंद्र देसाईनी म्हणणे मांडले.

Gokul Mahasangh
Beed OBC Morcha: 'आष्टीचा जब्या विधानसभेला मुंडेंकडे परत येईल...'; ओबीसी मोर्चातून सुरेश धसांबाबत मोठा दावा

'तू बोलू नको, चेअरमन सांगू देत, दूध उत्पादकांनीच बोलायचं.' अशी भूमिका शहाजी इंजुळकर, राजू इंजुळकर व सभासदांनी घेतली. अशातच वाद सुरू असतानाच ' सभा बरखास्त' असे बाळू देसाई ओरडताच अमोल देसाई यांच्यासह काहीजण बळवंत देसाई यांच्यावर धावले. त्यातच बाजूला कांही तरुणांमध्येही वाद उडाला. .

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com