Gokul News : गोकुळचे सत्ताधारी 74 कोटींचा मलिदा निवडणुकीत वापरण्याच्या तयारीत? दूध संस्था चालकांना वेगळाच संशय

Gokul News : कोल्हापूर गोकुळ दूध संघातील डिबेंचर रकमेवरून वाद तीव्र झाला आहे. १० ऑक्टोबरपर्यंत परतफेड न झाल्यास आंदोलनाची चेतावणी देण्यात आली असून ७४ कोटींच्या निधीवर संशय व्यक्त केला जातो.
Navid Mushrif to Take Over as Gokul Dairy Chairman
Navid Mushrif to Take Over as Gokul Dairy ChairmanSarkarnama
Published on
Updated on

Gokul News : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघातील (गोकुळ) डिबेंचर रक्कम प्रकरणातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. कपात होणारी रक्कम १० ऑक्टोबरपर्यंत परत मिळावी, अन्यथा आंदोलन करण्याचा पवित्र काही दूध संस्थांनी घेतला आहे. अशात डिबेंचरमधून कपात केलेली ७४ कोटींची रक्कम पुढील वर्षी होणाऱ्या सत्ताधारी निवडणुकीत वापरणार आहेत की काय? असा संशय दूध संस्थांना येऊ लागला आहे.

गोकुळमध्ये यापूर्वी प्रतिलिटर २७ पैसे कपात होत असताना यंदा डिबेंचर रक्कमेत तब्बल १ रुपये ५ पैसे कपात केली. याचा फटाका दूध संस्थांना बसणार आहे. हे पैसे परत मिळविण्यासाठी दूध संस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मात्र या पाठीमागे आता दूध संस्थांना वेगळाच संशय आला आहे. कोल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या गोकुळमधील या गोंधळाने राजकीय चर्चांना बळ मिळत आहे.

नेमके प्रकरण काय?

गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी ४ दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन दूध फरकाची रक्कम जाहीर केली. त्यात म्हैस दुधाला प्रतिलिटर २ रुपये ४५ पैसे, तर गाय दुधाला प्रतिलिटर १ रुपया ४५ रुपये जाहीर केले. ही एकत्रित रक्कम सुमारे १३६ कोटी रुपये होते. प्रतिलिटरप्रमाणे ही रक्कम जाहीर केली असली तरी त्याचे वाटप करताना ते टक्केवारीत करण्यात आले.

यामुळे म्हैस दूध फरक रकमेत ४० टक्के, तर गाय दूध फरक रकमेत ४५ टक्के घट झाली आहे. संस्थांकडे ती टक्केवारीत आल्याने जाहीर केलेल्या पैशांपेक्षा कमी पैसे मिळाल्याने प्राथमिक दूध संस्थांत उद्रेक झाला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘गोकुळ’ने केलेली ही चलाखी दूध उत्पादकांच्याही असंतोषाला कारण ठरण्याची शक्यता आहे.

Navid Mushrif to Take Over as Gokul Dairy Chairman
Gokul News : पैशांसाठी संस्थाचालक गोकुळ दूध संघात घुसले : CO घामाघूम; 10 ऑक्टोबरपर्यंतची मुदत

नफा, ठेवी वाढल्या मग कपात का?

जिल्ह्यात अतिरिक्त व अवेळी झालेल्या पावसाने बहुंताशी पिके धोक्यात आहेत, उसाचे वजन घटले आहे. काही ठिकाणी पुरामुळे ऊस पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे केवळ दूध उत्पादनांवर जिल्ह्यातील शेतकरी अवलंबून आहे. दुसरीकडे ‘गोकुळ’ला यावर्षी चांगला नफा झाला. ठेवीतही वाढ झाली असे सांगितले जाते. संघाची प्रगती होत असेल तर मग उत्पादकांच्या बिलातून कपात कशासाठी? असा सवाल संस्था चालकांकडून केला जात आहे.

Navid Mushrif to Take Over as Gokul Dairy Chairman
Gokul debenture issue : गोकुळमध्ये नेत्यांनी एका हाताने दिले, दुसऱ्या हाताने काढून घेतले? डिबेंचर रकमेबाबत संस्थाचालक अस्वस्थ

संस्था चालकांचा रोष का?

यापूर्वी डिबेंचर म्हणून जवळपास सरासरी प्रतिलिटर 27 पैसे हे रक्कम कपात केली जात होती. मात्र यंदाही रक्कम प्रति लिटर एक रुपया पाच पैसे इतकी केली आहे. एका संस्थेचे उदाहरण द्यायचे झाल्यास एका संस्था चालकाने सांगितले की, मागील चार वर्ष डिबेंचरमध्ये ५ लाखापर्यंत कपात आहे. पण यंदा एक वर्षाची कपातीची रक्कम अडीच लाख रुपये आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com