Basanagouda yatnal: कोरोना भ्रष्टाचाराचा 'व्हायरस' भाजप आमदाराच्या अंगलट; पक्षश्रेष्ठी कारवाई करणार ?

Karnataka Politics:काही दिवसांत यत्नाळ यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.
Basanagouda Patil Yatnal:
Basanagouda Patil Yatnal:Sarkarnama
Published on
Updated on

कर्नाटकमधील भाजपे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पक्षाच्या विरोधात केलेले विधान त्यांचा अंगलट येण्याची शक्यता आहे. येडीयुराप्पा सरकारने कोरोना काळात ४० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप आमदार यत्नाळ यांनी दोन दिवसापूर्वी केला आहे. त्या विधानावरुन यत्नाळ यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत भाजपच्या बैठकीत देण्यात आले आहे.

यत्नाळ यांनी केलेल्या आरोपावरुन भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि येडियुरप्पा यांचा धाकटा मुलगा बी.वाय. विजयेंद्र आक्रमक झाले आहेत. त्यांनी बुधवारी प्रदेशाध्यक्ष म्हणून घेतलेल्या पक्षाच्या पहिल्याच बैठकीत बसनगौडा पाटील यत्नल यांच्यावर कारवाईसाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांत यत्नाळ यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.

भाजपाचे ज्येष्ठ नेते बसनगौडा पाटील यत्नल यांनी स्वपक्षीय नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर ४० हजार कोटी रुपयांचा कोविड घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावरून कर्नाटक भाजप आक्रमक झाली आहे. कर्नाटक भाजपकडून नवीन नियुक्या केल्या आहेत. यात निवड करण्यात आलेले पदाधिकारी येडिपुरप्पा यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांची नुकतीच बैठक झाली. यत्नाळ यांच्यावर कारवाई करण्यास उशिर झाल्याचे या नवीन पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यत्नल यांच्यावर कारवाई न करता त्यांना पाठिंबा दिला तर आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाचे दुर्लक्ष होईल, असे त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले.

Basanagouda Patil Yatnal:
Raju Patil: राज ठाकरे-मुख्यमंत्री शिंदे नेहमी का भेटतात ? राजू पाटलांनी सांगितलं 'हे' कारण

"मला पक्षातून काढलं तर मी कोरोना काळातील भष्ट्राचार प्रकरणाचा भांडाफोड करणार," असा इशारा बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी नुकताच दिला. 'सरकार आमचे असले म्हणून काय झाले, शेवटी चोर तो चोरच असतो, असे सांगत त्यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे.

येदियुरप्पा सरकारने 45 रुपयांचे मास्क 485 रुपयांत खरेदी केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. "बंगळुरुत 10 हजार बेड्सची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी भाड्याने 10 हजार बेड्स मागवण्यात आले होते. जेव्हा मला कोविड झाला तेव्हा मणिपाल रुग्णालयाने 5 लाख 80 हजार रुपये मागितले होते. गरीब माणूस इतके पैसे कुठून आणणार?" असे यत्नाळ म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"जर आपल्याला पक्षातून काढलं तर आपण त्या लोकांची नावं उघड करु ज्यांनी पैसे लुटले आणि संपत्ती कमावली, अशी धमकीच त्यांनी दिली आहे. येदियुरप्पा यांचं सरकार असताना 40 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. त्यांनी प्रत्येक करोना रुग्णाच्या नावे 8 ते 10 लाखांचं बिल बनवलं आहे असा आरोप त्यांनी केला आहे. यत्नाळ यांच्या या आरोपावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, " यत्नाळ यांनी कोरोनाबाबत केलेला आरोप हा आमच्या अंदाजानुसार १० पटींनी जास्त आहे,"

Basanagouda Patil Yatnal:
Raju Patil: जरांगेंना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं असतं, तर ही वेळ आली नसती!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com