Kolhapur Politics : ठरलं! महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेची सूत्रे अबिटकरांच्या हाती, तर राष्ट्रवादीची धुरा एकटे मुश्रीफ सांभाळणार

Kolhapur Municipal Elections : कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेची जबाबदारी जिल्ह्यातील दोन मंत्र्यांवर सोपवली आहे. या दोन्ही महापालिकेतील शिवसेनेची जबाबदारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर तर राष्ट्रवादीची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आहे.
 Prakash Abitkar, Hasan Mushrif
Prakash Abitkar, Hasan Mushrifsarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 13 Aug : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांनी चक्रे गतिमान झाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर महापालिका आणि इचलकरंजी महापालिकेतील चार सदस्य प्रभाग रचनेनंतर निवडणुकीच्या खऱ्या रंगाला सुरुवात होणार आहे.

त्यातच पक्षीय पातळीवर विविध खात्यातील मंत्र्यांचे दौरे निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात वाढले आहेत. त्यामुळे कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेतील विविध पक्षांच्या जोर, बैठका वाढल्या आहेत. शिवाय पक्षीय स्तरावर या निवडणुकांची जबाबदारी जिल्ह्यातील विद्यमान मंत्र्यांवर सोपवली आहे.

कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेची जबाबदारी जिल्ह्यातील दोन मंत्र्यांवर सोपवली आहे. या दोन्ही महापालिकेतील शिवसेनेची जबाबदारी हे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापुरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर तर राष्ट्रवादीची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आहे. तर इचलकरंजीसाठी खासदार धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखाली सामोरे जाणार आहेत.

 Prakash Abitkar, Hasan Mushrif
NDA Vs Congress : 'एनडीए'ची सत्ता गेली, काँग्रेसचे निवडून आलेले सर्व 23 आमदार बनले मंत्री; महिला नेत्यानं उलटवला होता डाव

कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आबिटकर यांच्या नेतृत्वाखालीच शिवसेनेतील समन्वय हा महायुतीत राखला जाणार आहे. शिवाय इच्छुकांची पक्षप्रवेश, जागा वाटपा संदर्भातील सर्वाधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंत्री आबिटकर यांना दिल्याचे समजते. त्यामुळे सुरुवातीपासूनच मंत्री आबिटकर यांच्या माध्यमातून आजी-माजी नगरसेवकांचे पक्ष प्रवेश करण्याचे काम सुरू आहे.

आतापर्यंत तब्बल आजी माझी आणि प्रमुख 30 पदाधिकाऱ्यांची पक्ष प्रवेश शिंदेंच्या शिवसेनेत झाले आहेत. पुढील काळात राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून अनेकांचे पक्षप्रवेश होणार आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीत जिल्ह्याचे एकमेव मंत्री म्हणून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाहिले जाते.

 Prakash Abitkar, Hasan Mushrif
Sharad Pawar : शरद पवारांच्या काळातील 'तो' आदेश कत्तलखाने बंद ठेवण्याचा होता मास विक्रीसाठीचा नाही? अत्यंत जवळच्या नेत्याचे मोठे विधान

जिल्हा पातळीवर कोल्हापूर महापालिकेतील सर्वच सूत्रे आणि अधिकारी मंत्री मुश्रीफ यांच्याकडे असणार आहेत. मागील महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने केवळ चार जागांवर विजय मिळवला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 14 जागा मिळाल्या होत्या आणि भाजप ताराराणीने अनुक्रमे 14-19 जागा मिळवल्या होत्या.

सुरुवातीपासूनच भाजपकडून 35 जागांवर दावा केला जात आहे. तर ज्या ठिकाणी युती म्हणून लढायचे आहे. त्या ठिकाणी महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवली जाणार आहे. तर ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांची संख्या अधिक आहे त्या ठिकाणी महायुती ही स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा यापूर्वी महायुतीतील सर्वच नेत्यांनी केली आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीतील समन्वय साधण्याचे अधिकार मंत्री मुश्रीफ आणि पालकमंत्री आबिटकर यांच्यावर आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com