
Bihar politics news : मागील काही वर्षांत अनेक राज्यांमध्ये युती-आघाडीचीच सत्ता आहे. भाजप, काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षांच्या कुबड्या घेऊन सत्ता स्थापन करावी लागली. बहुमतासाठी घोडेबाजार केल्याची अनेक उदाहरणे आहेत. देशातील सत्तास्थापनेची अशीच एक घडामोड आजही लक्ष वेधून घेते. सत्तेसाठी नेते किती टोकाचे निर्णय घेऊ शकतात, याचेच हे उदाहरण म्हणता येईल. अखंड बिहारची 2000 ची निवडणूक अनेक अर्थांनी नाटकीय ठरली होती.
बिहारमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून एनडीए विरुध्द इंडिया आघाडी असाच थेट सामना होणार आहे. 2000 च्या निवडणुकीनंतरची स्थिती काहीशी अशीच होती. पण निवडणुकीआधीचे गणित वेगळे होते. बिहारमध्ये त्यावेळी 324 जागा होत्या. निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय जनता दलाने 124 जागा जिंकल्या. तर भाजपला 67, समता पक्षाला 34, काँग्रेसला 23, अपक्ष 20, झारखंड मुक्ती मोर्चा 12 आणि डाव्या पक्षांना 13 जागा मिळाल्या. बहुमताचा आकडा कोणताच पक्ष गाठू शकला नाही.
निवडणुकीआधी लालूंच्या पत्नी राबडी देवी मुख्यमंत्री होत्या. पण निकालानंतर एनडीएल सत्तास्थापनेची संधी मिळाली. भाजपने समता पक्षाचे नेते नीतिश कुमार यांना मुख्यमंत्री बनविले. पण बहुमत सिध्द करण्याआधीच सात दिवसांत नितीश कुमारांनी राजीनामा दिला. काँग्रेसच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न अपयशी ठरला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 11 मार्च रोजी राबडीदेवी यांनी पुन्हा एका मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. लालूंनी काँग्रेससह डावे पक्ष व इतर छोट्या पक्षांना एकत्रित करण्यात यश मिळविले होते. मात्र, त्यासाठी त्यांना काँग्रेसची सर्वात मोठी मागणी मान्य करावी लागली होती.
निवडणुकीमध्ये काँग्रेसने स्वतंत्रपणे मते मागितली होती. प्रचारात लालूंच्याविरोधात मैदाना गाजविणारे नेत्यांना सत्तेत गेल्यानंतर मंत्रिपदाचे वेध लागले. लालूंनीही मग सत्ता टिकविण्यासाठी काँग्रेसच्या 22 आमदारांना मंत्री केले. तर एका ज्येष्ठ आमदाराला विधानसभा अध्यक्षपद दिले. या पदालाही मंत्रिपदाचाच दर्जा असतो. पहिल्यांदाच एखाद्या पक्षाचे सर्व निवडून आलेल्या एवढ्या आमदारांना मंत्रिपद मिळाले होते. लालूंनी ही किमया केली होती.
बिहारमधील या राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेसचा किल्ला लढवत होत्या मोहसिना किडवाई. त्यावेळी त्या बिहारच्या प्रभारी होत्या. त्यांच्यासोबत अजित जोगी हे मातब्बर नेतेही होते. बिहारमध्ये या राजकीय घडामोडी घडत असताना त्यांनी पक्षाच्या सर्व आमदारांना एकजुट ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. या आमदारांची दिल्लीत खास व्यवस्था करण्यात आली होती. किडवाई यांच्याच नेतृत्वाखाली त्यावेळी काँग्रेसला सत्तेत मानाचे पान मिळाले होते. किडवाई या दिवंगत इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या केंद्रीय मंत्रिमडळात होत्या. मुळच्या उत्तर प्रदेशच्या असलेल्या किडवाई यांनी पक्षातील अनेक महत्वाची पदे भूषविली. त्या पक्षाच्या महासचिवही होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.