Kolhapur News : मागील काही वर्षांत महाविकास आघाडी म्हणून मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा बँक, गोकुळ दूध संघ, कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती आणि शेतकरी संघात साम्राज्य निर्माण केले आहे. खांद्याला खांदा लावून लढाईत असणारे आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ मात्र लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. (Lok Sabha Election 2024)
महाविकास आघाडी कडून शाहू महाराज छत्रपती तर महायुतीकडून संजय मंडलिक यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. या दोघांवरच महाविकास आणि महायुतीच्या उमेदवारांची मदार आहे. पण या सर्व घडामोडीत स्थानिक सहकारी संस्थेतील संचालकांची गोची झाली आहे. आपले दोन्हीही नेते एकमेकांच्या विरोधात आहेत. मात्र कोणता झेंडा घेऊ हाती, असा सवाल त्यांच्यात उपस्थित झाला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ आणि कोल्हापूर जिल्हा बँक या दोन्हीही संस्था जिल्ह्याच्या राजकारणातील केंद्रस्थानी आहेत. जिल्ह्यातील नेत्यांच्या राजकारणाच्या नाड्या यावर अवलंबून आहेत. अशातच राज्यात महाविकास आघाडीचा उगम झाल्यानंतर सध्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघ आणि जिल्हा बँकेवर एकतर्फी सत्ता आणली. यात आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि मुश्रीफ यांनी त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांना संधी देत संचालक केले. मात्र, या लोकसभेला संचालकांसमोर कोणाला पाठिंबा द्यायचा, यावरून पेच निर्माण झाला आहे.
कोल्हापूर दूध उत्पादक संघ म्हणजे गोकुळ दूध संघातील 24 पैकी 12 संचालक हे आमदार सतेज पाटील यांच्यासोबत आहेत, तर पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यासोबत 11 संचालक आहेत. तर डॉ. चेतन नरके हे स्वतः लोकसभेच्या रिंगणात आहेत. संचालकापासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत गाव पातळीवर पोहोचण्यासाठी या सर्व घटकांची महत्त्वाची मदत होते. अशातच कार्यकर्त्यांना दिलेले बळ हे विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून उपयोगी येते. तर जिल्हा बँकेतील 21 पैकी 16 संचालक मंत्री तर 5 संचालक आमदार पाटील यांच्यासोबत आहेत.
महायुती :
अरुण डोगळे, नविद मुश्रीफ, प्रा. किसन चौंगले, रणजित पाटील, अभिजित तायशेटे, नंदकुमार ढेंगे, एस. आर. पाटील, शोमिका महाडिक, अजित नरके, युवराज पाटील, मुरलीधर जाधव.
महाविकास आघाडी :
विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे, बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील- चुयेकर, प्रकाश पाटील, बयाज़ी शेळके, कर्णसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, अंजना रेडेकर, अंबरिश घाटगे
महायुती :
हसन मुश्रीफ, विनय कोरे, संज़य मंडलिक, निवेदिता माने, अमल महाड़िक, राजेश पाटील, भैय्या माने, बाबासाहेब पाटील- आसुलेंकर, सुधीर देसाई, रणवीर गायकवाड, राजेंद्र पाटील-यड्रावकर, संतोष पाटील, अर्जुन आबिटकर, रणजित पाटील, विज़यसिंह माने.
आघाडी :
सतेज पाटील, पी. एन. पाटील, राजू
आवळे, स्मिता गवळी, श्रुतिका काटकर
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.