Kolhapur Lok Sabha Constituency : यंदाही संदीपचा जलवा, कोल्हापूर लोकसभेसाठी भरला तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज !

The nomination form has been filed by coming to the collector office on a bicycle : सायकलवरून जिल्हाधिकारी कार्यालयात येत दाखल केला उमेदवारी अर्ज..
Sandeep Sankpal kolhapur loksabha
Sandeep Sankpal kolhapur loksabhaSarkarnama

Kolhapur News : लोकसभा निवडणुकीत मातब्बर असणाऱ्या उमेदवारांची चर्चा जास्त रंगत असते. मात्र त्यांच्यासोबत इतरही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतात. मग प्रसिद्धीसाठी असो वा आवड म्हणून उमेदवारी अर्ज भरणारे हौशी असतात. असाच एक अवलिया गेल्या तीन टर्मपासून उमेदवारीचा अर्ज कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून भरत आला आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्याने 11 हजार, तर 2019 च्या निवडणुकीत साडेसहा हजार मतदान मिळवले आहे. त्यामुळे चर्चेत राहिलेल्या या अवलियाने यंदाही सायकलवरून येत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी आज 19 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. आत्तापर्यंत कोल्हापूर (Kolhapur) लोकसभा मतदारसंघातून 14 जणांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. कोल्हापूर लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार संदीप संकपाळ तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करत असून, यंदा त्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत सायकलवरून जिल्हाधिकारी कार्यालयात येत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sandeep Sankpal kolhapur loksabha
Sunil Chavan Join BJP: धाराशिवमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव सुनील चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार

अपक्ष उमेदवार संदीप संकपाळ यांनी 2024 आणि 19 च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून अनुक्रमे 10 हजार 963 आणि साडे सहा हजारांचं मतदान मिळवलं होतं, यावर्षीच्या लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत सलून व्यावसायिक असलेले 43 वर्षीय संदीप संकपाळ यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी ते जिल्हाधिकारी कार्यालयात सायकलवरून प्रवास करत आले.

लांबसडक मानेपर्यंत केस, रुबाबदार व्यक्तिमत्त्व यामुळे सचिन संकपाळ यांना त्यांच्या गावी करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथे भावी खासदार (MP) म्हणून ओळखलं जातं. आई पत्नी आणि दोन मुलांसह ते राहतात, 2019 मध्ये स्थापन केलेल्या 'बरंच काही' फाउंडेशनच्या माध्यमातून ते सामाजिक कार्य करत असतात दीपावली आणि सणांदिवशी गोरगरीब लोकांना मदतीचा हात, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून संदीप संकपाळ यांचं सामाजिक काम सुरू आहे.

Edited By : Chaitanya Machale

  • R

Sandeep Sankpal kolhapur loksabha
Ravindra Dhangekar: पुण्यासाठी आघाडीची फिल्डिंग, धंगेकरांच्या प्रचारासाठी राहुल गांधींची हजेरी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com