Ravindra Dhangekar: पुण्यासाठी आघाडीची फिल्डिंग, धंगेकरांच्या प्रचारासाठी राहुल गांधींची हजेरी

Lok Sabha Election 2024: प्रचार करताना आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं म्हणत जे लोक आचारसंहितेचा भंग करतील त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशी मागणी रवींद्र धंगेकरांनी केली आहे.
Rahul Gandhi, Ravindra Dhangekar
Rahul Gandhi, Ravindra DhangekarSarkarnama

Pune Lok Sabha Election 2024 : पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी काल गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी आता जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. आज त्यांनी पुण्याचं ग्राम दैवत कसबा गणपतीच्या मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात केली. यावेळी महाविकास आघाडीतले सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी पदयात्रेत सहभागी झाले होते.

काल उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पदयात्रा आणि जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. पदयात्रेदरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, आपल्या प्रचारासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी (Rahul Gandhi and Priyanka Gandhi) येणार असल्याचं धंगेकरांनी सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर राहुल गांधीची सभा कधी आणि कुठे होणार याबाबतची माहिती लवकरच कळवली जाईल असं रवींद्र धंगेकर म्हणाले. तसेच प्रचार करताना आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं म्हणत जे लोक आचारसंहितेचा भंग करतील त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशी मागणीदेखील धंगेकरांनी यावेळी केली.

Rahul Gandhi, Ravindra Dhangekar
Sanjay Raut: राऊतांना नवनीत राणांवरील टीका भोवणार? युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी उचललं मोठं पाऊल

पुणे मतदारसंघात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर, महायुतीचे मुरलीधर मोहोळ आणि वंचित बुहजन आघाडीचे वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे या लढतीकडे विशेष लक्ष लागलेलं आहे. आपापल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. यासाठी आता महाविकास आघाडीकडूनही पुणे मतदारसंघात मोठ्या नेत्यांची सभा घेतली जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com