Kolhapur News: पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी वारंवार महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj) यांना राजकारणात न येण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्याबद्दल आदर असून त्यांनी लोकसभेच्या (Kolhapur Lok Sabha Election 2024) रणांगणात उतरु नये, अशी भूमिका वारंवार पालकमंत्री मुश्रीफ यांनी मांडली आहे.
गुरुवारी पुन्हा एकदा मुश्रीफांनी शाहू महाराज यांच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीला डिवचले आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघातील झालेल्या महायुतीच्या कार्यकर्त्या मेळाव्यात त्यांनी शाहू महाराज यांना फेरविचार करण्याचा सल्ला दिला आहे.
शाहू छत्रपती यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे परंतु ते लोकसभेचे उमेदवार म्हणून एका पक्षाचे झाले. त्यामुळे ते वादात ओढले जाणार हे उघड होते. म्हणूनच त्यांना मी पूर्वीपासून राजकारणात येऊ नये अशी विनंती केली होती. अजूनही वेळ गेलेला नाही त्यांनी उमेदवारीबाबत फेरविचार करावा, असा सल्ला हसन मुश्रीफ यांनी दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ज्यावेळी खासदार संजय मंडलिक यांच्या बद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल करण्यात आले. त्यावरून महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून ही उलट उत्तर दिले जातील. तेव्हा वादाला सुरुवात होईल असं मला वारंवार वाटत होतं. जर काँग्रेसला खरोखरच छत्रपती यांच्या बद्दल आदर होता तर त्यांनी राज्यसभा द्यायला हवी होती. महायुतीने देखील संभाजी राजेंना खासदार केलेच होते. त्यामुळे या वादावर पडदा टाकावा, अशी आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.