Kolhapur News: वादग्रस्त वक्तव्यानंतर शाहू छत्रपती कुटुंब आणि मंडलिक एकत्र

Sanjay Mandlik On Shahu Maharaj: गेल्या आठवड्यात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज यांच्या दत्तक प्रकरणाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली होती. राज्यभरातून मंडलिक यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आला होता.
Sanjay Mandlik, Malojiraje
Sanjay Mandlik, MalojirajeSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Lok Sabha Election 2024: रामनवमीच्या निमित्ताने कागल येथील राम मंदिरात लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) व काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती (Srimant Shahu Chhatrapati) यांचे पुत्र माजी आमदार मालोजीराजे (Malojiraje) सहकुटुंब एकत्र आले. अलीकडेच मंडलिक यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्‍वभूमीवर या दोघांना एकत्र बघून लोकही अवाक् झाले. मात्र, दोघांत काही विशेष संभाषण झालं नाही.

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी जिल्ह्यातील लोकसभेचे (Lok Sabha) वातावरण चांगलंच तापलं आहे. दोन्ही आघाडींच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यात उमेदवारांपेक्षा त्यांचे पाठीराखे असलेल्या नेत्यांना लक्ष्य केलं जात आहे. पण, गेल्या आठवड्यात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांनी शाहू महाराज यांच्या दत्तक प्रकरणाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली होती. राज्यभरातून मंडलिक यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आला होता. कोल्हापुरात (Kolhapur) महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शनेही करण्यात आली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशातच आज शहर व जिल्ह्यातील राम मंदिरात रामनवमी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. अंबाबाई मंदिरातील राम मंदिराला श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांनी भेट देत जन्मोत्सवालाही हजेरी लावली. तर कागल येथे शाहू कारखान्याचे संस्थापक दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांच्या पुढाकारातून उभारलेल्या राम मंदिरातही मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी करण्यात आली.

Sanjay Mandlik, Malojiraje
Shahu Maharaj News : शाहू महाराजांच्या पोस्टरवरून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोच गायब! शिंदे गटाने डिवचलं

या मंदिरातील राम जन्मोत्सवाला मंडलिक अगोदरच दाखल झाले होते. त्यानंतर माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, त्यांच्या पत्नी मधुरिमाराजे यांनीही हजेरी लावली. या दोघांच्या हस्ते आरती करण्यात आली. ‘शाहू’ ग्रुपचे समरजितसिंह घाटगे यांनी या दोघांचे स्वागत केले. या वेळी प्रवीणसिंह घाटगेही उपस्थित होते. समरजितसिंह घाटगे हे मंडलिक यांच्या प्रचारात सक्रिय आहेत, तर मंडलिक यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर थेट मालोजीराजे हेच त्यांच्या समोर आले. या दोघांना एकत्रित पाहून लोकांच्या भुवया उंचावल्या.

मानाचा नारळ ...

संजय मंडलिक आपल्या सहकाऱ्यांसह श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्यात उभे असताना माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांचे श्रीराम मंदिरात आगमन झाले. या वेळी मंडलिक यांना मानाचा नारळ देऊ केला. पण, मंडलिक यांनी पाहुणे म्हणून आलेल्या मालोजीराजांच्या हाती हा नारळ द्यावा, अशी पुजाऱ्यांना विनंती केली. त्यावर मालोजीराजे यांनीही मंडलिकांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखत हा नारळ मंडलिकांकडे द्यावा, असे सांगितले. त्यानंतर पुजाऱ्यांनी तो नारळ मंडलिक यांच्याकडे सुपूर्त केला.

(Edited By Jagdish Patil)

  • R

Sanjay Mandlik, Malojiraje
Sanjay Mandlik News : 'माझ्यासाठी शिंदे- फडणवीस आले, पण महाराजांकडे आघाडीच्या बड्या नेत्यांनी फिरवली पाठ'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com