Sanjay Mandlik News : 'माझ्यासाठी शिंदे- फडणवीस आले, पण महाराजांकडे आघाडीच्या बड्या नेत्यांनी फिरवली पाठ'

Kolhapur Loksabha Latest Marathi News : महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राज्यातील एकही वरिष्ठ नेता उपस्थित राहिला नाही, अशा शब्दांत मंडलिक यांनी ताशेरे ओढले आहेत.
Shahu Maharaj Chhatrapati
Shahu Maharaj ChhatrapatiSarkarnama

Kolhapur Lok Sabha Constituency 2024 : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून मंगळवारी महाविकास आघाडी संघटित शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati) यांनी भव्य शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

त्यावेळी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील, आमदार पीएन पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. मात्र, तोच धागा पकडून महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी महाविकास आघाडीच्या राज्यातील नेत्यांवर हल्लाबोल केला आहे.

माझा उमेदवारी अर्ज दाखल करताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची उपस्थिती होती.

मात्र, महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राज्यातील एकही वरिष्ठ नेता उपस्थित राहिला नाही, अशा शब्दांत मंडलिक यांनी ताशेरे ओढले आहेत.

मान गादीला मत मोदीला ही कोल्हापुरातील एक लोकप्रिय घोषणा आहे. याचं भान आम्ही बाळगतो, मात्र दुर्दैवाने आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी जो अर्ज भरला. त्यावेळी दुर्दैवाने राज्यातला एकही वरिष्ठ नेता आला नाही.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराजांचा अपमान केला आहे का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूरच्या गादीचा मान राखायचा असता तर राज्यातल्या तिन्ही पक्षांतला कुणी ना कुणीतरी नेता यायला पाहिजे होता, असे मंडलिक यांनी म्हटले आहे.

याउलट माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री स्वतः जातीने आलेत. निवडणूक ही गांभीर्याने घ्यायची असते, काँग्रेस पक्षाने हे ठरवलेलं नाही. ही जागा गेलेली आहे का? असं कदाचित त्यांना वाटत असेल. फॉर्म भरताना त्यांचा सन्मान राखला नाही, याचं मला खेद वाटत आहे, अशा शब्दांत मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी निशाणा साधला आहे.

Shahu Maharaj Chhatrapati
Abhijit Bichukale news: बिचुकलेंनी दिले उदयनराजेंना आव्हान; म्हणाले, त्यांनी आत्मपरीक्षण करावे, मी अर्ज भरणारच...!

सत्यजित पाटील सरुडकर यांची उमेदवारी कदाचित जयंत पाटील Jayant Patil यांना महत्त्वाची वाटली असेल. महाराजांची उमेदवारी ही कदाचित राजकीय बळी देण्यासाठीच उभी केलेली आहे, की काय ही शंका मी वारंवार व्यक्त करतोय, असा खोचक टोला लगावला.

मुख्यमंत्री जिथे जिथे महायुतीचे उमेदवार आहेत तिथे तिथे जाणारच आहेत. मुख्यमंत्र्यांचे राज्यभर कार्यकर्ते आहेत. मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री होण्याआधीपासूनच ते कार्यकर्ता आहेत. आज जे मुख्यमंत्री आहेत ते कार्यकर्ता म्हणून वावरत आहेत. कोल्हापुरात पहाटे सहा वाजेपर्यंत ते लोकांना भेटत होते.

एक कार्यकर्ता कशा पद्धतीने मुख्यमंत्री झाल्यानंतर काम करू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब आहेत. सतेज पाटलांना Satej Patil जर असं वाटत असेल की आमच्या मुख्यमंत्र्यांनी कुठे प्रचारालाच येऊ नये तर खरं म्हटलं तर त्यांचा भ्रम आहे.

मोठे नेते कोल्हापुरात आल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असेल. मुख्यमंत्री कोल्हापुरात Kolhapur किती वेळा यावेत, याच्यापेक्षा त्यांची नेते इथे येणार की नाहीत याची चर्चा महत्त्वाची आह, असेही मंडलिक म्हणाले.

स्थानिक नेत्यांचे महत्त्व वाढवणारी ही निवडणूक आहे. या निवडणुकीला स्थानिक नेत्यांनी उभारला असतं तर जोरदार झाली असती. पण ते उभारले नाहीत महाराज साहेबांचा राजकीय बळी देण्यासाठी उमेदवार म्हणून त्यांना उभं केलेले आहे, असे सांगत मंडलिक यांनी अजित पवार Ajit Pawar म्हणतात एखाद्या निवडणुकीत जर कार्यकर्ता सापडला नाही तर नेता शोधा, नेता सापडला नाही तर अभिनेता शोधा, अभिनेता जरी सापडला नाही तर सेलिब्रिटी शोधा. महाविकास आघाडीने तसंच सेलिब्रिटी कोल्हापुरात उभा केलेला आहे, असा टोलादेखील मंडलिक यांनी लगावला.

R

Shahu Maharaj Chhatrapati
Shahu Maharaj Net Worth : अबब! शाहू महाराज लईच 'श्रीमंत', तब्बल 300 कोटींचे मालक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com