Chetan Narke News : आडवा पाय माराल तर गाठ माझ्याशी, शाहू महाराजांना पाठिंबा देताना चेतन नरकेंनी दिला इशारा !

Kolhapur Lok Sabha Constituency : करवीर विधानसभा मतदारसंघात शाहू छत्रपतींना मोठे मताधिक्य देऊन येथेच त्यांच्या विजयाची पायाभरणी केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला..
Shahu Maharaj Supported by Chetan Narke
Shahu Maharaj Supported by Chetan Narke Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : लोकसभेच्या रिंगणातून माघार घेऊन चेतन नरके यांनी काय मिळवले, अशी चर्चा माझे काही हितचिंतक करत आहेत. पण, अडीच वर्षांत मी जे काही मिळवले, ते आज माझ्या समोर आहे. माझी चिंता करण्यापेक्षा आपला गट सांभाळा, आडवा पाय माराल तर याद राखा गाठ माझ्याशी आहे. मलाही मग ‘कुंभी’ सह इतर संस्थेत लक्ष घालावे लागेल, असा इशाराही डॉ. चेतन नरके यांनी दिला.

महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना मंगळवारी डॉ. नरके यांनी पाठिंबा दिला. त्यावेळी झालेल्या पाठिंबा सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण नरके होते.

डॉ. चेतन नरके म्हणाले, कोल्हापूरच्या (Kolhapur) विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, थांबावे लागले म्हणून नाराज न होता, शाहू- फुले-आंबेडकर यांचे विचार घेऊन पुढे जाणाऱ्या शाहू छत्रपतींना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. व्यासपीठावरील उपस्थिती पाहता, भविष्यातील नवीन समीकरणे काय असणार हे वेगळे सांगण्याची गरज नसल्याचे सूचक वक्तव्य करत चेतन नरके म्हणाले, करवीर विधानसभा मतदारसंघात शाहू छत्रपतींना मोठे मताधिक्य देऊन येथेच त्यांच्या विजयाची पायाभरणी केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shahu Maharaj Supported by Chetan Narke
Jarange Patil Warning : मोदीसाहेब, महाराष्ट्रातील तुमच्या कर्त्या नेत्याला थोडी समज द्या; जरांगे पाटलांचा इशारा कोणाकडे

शाहू छत्रपती म्हणाले,डॉ. चेतन नरके यांनी आपल्या वडिलांच्या विचारांचा वारसा घेऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या दोघांचे विचार एकच असून, शेतकरी (Farmer) केंद्रबिंदू मानून आगामी काळात काम करणार आहे. मी जरी जग फिरलो असलो तरी डॉ. चेतन नरके यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुभव खूप मोठा आहे. त्यांच्याकडे कोल्हापूरच्या विकासाचे व्हिजन असून, तेच घेऊन मी कोल्हापूरचा विकास करणार असल्याची ग्वाही महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी दिली.

डॉ. चेतन यांचे कष्ट वाया जाऊ देणार नाही

डॉ. चेतन नरके यांनी गेली अडीच वर्षे कोल्हापूर मतदारसंघातून तयारी केली होती. गाव आणि वाड्यावस्त्यांवर जाऊन संपर्क मोहीम राबवली होती. त्यांनी उमेदवारीसाठीही प्रयत्न केले, पण काँग्रेसचा आग्रह शाहू छत्रपतींसाठी राहिल्याने त्यांना उमेदवारी मिळाली नाही. तरीही त्यांनी आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना पाठिंबा देऊन मनाचा मोठेपणा दाखवला. त्यांची अडीच वर्षांची मेहनत्, कष्ट हा सतेज पाटील वाया जाऊ देणार नाही, एवढी ग्वाही या मेळाव्याच्या निमित्ताने देतो, असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

(Edited by : Chaitanya Machale)

R

Shahu Maharaj Supported by Chetan Narke
Lok Sabha Election 2024 : सोलापूर अन् माढा मतदारसंघांत पक्ष बदलाची प्रक्रिया थांबता थांबेना

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com