Lok Sabha Election 2024 : सोलापूर अन् माढा मतदारसंघांत पक्ष बदलाची प्रक्रिया थांबता थांबेना

Solapur Lok Sabha Election 2024 : मागील एक महिन्याच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात अनेक दिग्गज नेत्यांनी पक्ष बदलले आहेत.
uttam jankar abhjit patil dhairyasheel mohite patil dhavalsinh mohite patil bhagirath bahlke dilip mane
uttam jankar abhjit patil dhairyasheel mohite patil dhavalsinh mohite patil bhagirath bahlke dilip manesarkarnama

Solapur News : सोलापूर ( Solapur ) जिल्ह्यातील राजकारण ऊन-सावलीसारखं बदलत आहे. नेते रात्रीत पक्ष बदलत आहेत. लोकसभेची घोषणा झाल्यानंतर अनेकजण एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारत आहेत. एकप्रकारे लोकसभेच्या माध्यमातून अनेकांनी विधानसभा, महापालिका, जिल्हापरिषद अगदी ग्रामपंचायत निवडणुकीचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही काही बडे नेते या रांगेत आहेत.

उन्हानं जनतेच्या अंगाची लाहीलाही होत असतानाच राजकीय वातावरणदेखील तापलं आहे. मागील एक महिन्याच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात अनेक दिग्गज नेत्यांनी पक्ष बदलले आहेत. यात 2019 मध्ये भाजपत प्रवेश केलेलं मोहिते-पाटील कुटुंब ( रणजितसिंह मोहिते-पाटील सोडून ) पुन्हा शरद पवार यांच्याबरोबर आलं आहे. धैर्यशील मोहिते-पाटील ( Dhairyasheel Mohite Patil ) यांच्या प्रवेशानंतर शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी माढा मतदारसंघ ( Madha Lok Sabha Constituency ) पिंजून काढत राजकीय जुळवाजुळव केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जानकरांनी घेतलं मोहिते-पाटलांशी जुळवून

त्याचाच प्रत्यय म्हणजे माळशिरसमधील धनगर नेते उत्तम जानकर ( Uttam Jankar ) यांनी भाजपला 'राम राम' ठोकत शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर 30 वर्षे कट्टर वैरी असलेल्या मोहिते-पाटील यांच्याशी जुळवून घेतलं. सध्या उत्तम जानकर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असल्याचं सांगतात. पण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सभांमधून जानकर अजितदादांवर तोफ डागताना दिसतात. ते माळशिरसमधून विधानसभा निवडणूक लढू शकतात.

करमाळ्यातील शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी पक्षाला 'जय महाराष्ट्र' करत 'तुतारी' हाती घेतली आहे. नारायण आबा पाटील आमदार संजयमामा शिंदे यांच्याविरोधात पुन्हा मैदानात उतरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीला सोडून भारत राष्ट्र समितीत ( बीआरएस ) गेलेले भगीरथ भालके यांनीही प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पण, भगीरथ भालके यांचं विधानसभेचं गणित अद्याप गुपितच आहेत, तर मोहोळ येथील संजय क्षीरसागर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. विधानसभेचा विचार करूनच क्षीरसागर यांनी 'तुतारी' हाती घेतली आहे.

दिलीप मानेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश

2019 च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर मध्य मतदारसंघात शिवसेनेचे दिलीप माने ( Dilip Mane ) विरुद्ध प्रणिती शिंदे ( Praniti Shinde ) यांच्यात लढत झाली होती. परंतु, प्रणिती शिंदे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं दिलीप माने यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दिलीप माने सध्या प्रणिती शिंदे यांचा प्रचार करत आहेत. विधानसभेचा अंदाज पाहूनच माने यांनी हा निर्णय घेतला असण्याची शक्यता वर्तवली जातेय.

माजी आमदार नरसय्या आडम, महेश कोठे यांनीही प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. तर, महेश कोठे यांचे पुतणे देवेंद्र कोठे यांनी भाजपत प्रवेश केलाय, तर बार्शीतील शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांना धाराशिव आणि मोहोळमधील राष्ट्रवादीचे रमेश बारसकर यांना माढ्यातून वंचित बहुजन आघाडीनं उमेदवारी दिली आहे.

uttam jankar abhjit patil dhairyasheel mohite patil dhavalsinh mohite patil bhagirath bahlke dilip mane
Loksabha Election 2024 : उदंड जाहले पक्षांतर... राजकीय उड्यांनी आसमंत गजबजला !

धवलसिंह मोहिते-पाटलांचा भाजपला पाठिंबा

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील हेही भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जातंय. एका तरुणाचा मारणाहीनंतर मृत्यू झाल्याप्रकरणी धवलसिंह मोहिते-पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून धवलसिंह मोहित-पाटील हे अज्ञातवासात गेले होते. पण, अचानक माध्यमांसमोर येत त्यांनी माढ्यातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पाठिंबा दर्शवला आहे.

अभिजित पाटलांनी घेतली फडणवीसांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेस शरद्रचंद्र पक्षातील नेते, श्री विठ्ठल सहकारी साखर चेअरमन अभिजित पाटील यांनीही भाजपला पाठिंबा दर्शविण्याची तयारी केली आहे. शिखर बँकेनं चारशे कोटींच्या थकबाकीचं कारण देत विठ्ठल कारखान्याचं गोडाऊन सील केलं आहे. त्यामुळे माढा आणि सोलापूर मतदारसंघात महाविकास आघाडीचं काम करणाऱ्या अभिजित पाटील यांनी कारखाना आणि शेतकरी प्रश्नावरून गुडगे टेकले आहेत. अभिजित पाटील यांनी फडणवीस यांची सोमवारी सोलापुरात भेट घेतली. 'लोकसभेला आम्हाला मदत करा, आम्ही कारखान्याला मदत करू,' अशी अट फडणवीस यांनी पाटील यांना घातली आहे. त्यामुळे 'शेतकऱ्यांसाठी आम्हाला मदत करेल, त्याला मदत करू,' अशी भूमिका पाटील यांनी घेतली आहे. अभिजित पाटील हे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा लढण्यास इच्छुक होते.

R

uttam jankar abhjit patil dhairyasheel mohite patil dhavalsinh mohite patil bhagirath bahlke dilip mane
Devendra Fadnavis : मोहिते पाटील फोडल्याचा फडणवीसांना एवढा राग...? मग ज्यांचे पक्ष फोडले त्यांचे काय...?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com