Kolhapur Lok Sabha News : 'मिसळ पे चर्चा' अन् काँग्रेसच्या नगरसेवकांवर गुन्हा दाखल; काल्हापुरात काय घडलं?

Kolhapur Lok Sabha Election 2024 : मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी शिवसेना पक्षाच्या वतीने न्यू पॅलेस परिसरात मिसळपे चर्चांचे आयोजन करण्यात आलं होतं.
Kolhapur Lok Sabha News
Kolhapur Lok Sabha NewsSarkarnama

Kolhapur News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवाराकडून प्रचाराच्या अनेक फंडे वापरले जात आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक उपक्रमाच्या माध्यमातून गर्दी जमून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. अशातच कोल्हापुरात प्रसिद्ध असणाऱ्या मिसळ पे चर्चा आयोजित करून मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न उमेदवार आणि नेत्यांकडून केला जात आहे. गल्लीबोळात होणारी मिसळ पे चर्चा आता ठीक ठिकाणी वादाचे विषय बनत आहेत. (Lok Sabha Election 2024)

कोल्हापुरातील (Kolhapur) कसबा बावडा येथे आयोजित करण्यात आलेल्या मिसळपे चर्चा कार्यक्रमात वादावादी झाल्याने काँग्रेसच्या माजी नगरसेवकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी शिवसेना पक्षाच्या वतीने न्यू पॅलेस परिसरात मिसळपे चर्चांचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजाराम गायकवाड यांनी शिवसेनेचे कार्यकर्ते असलेल्या ऋषिकेश सुरेश भद्रा यांना फोनवरून दमदाटी केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Kolhapur Lok Sabha News
Congress Vs BJP : भाजपचे 'अच्छे दिन' फक्त टीव्हीवरच, लातूरला चांगले दिवस आमच्यामुळे; देशमुखांनी डागली तोफ
Kolhapur Lok Sabha News
Ajit Pawar NCP : बारामतीत 'घड्याळा'च्या प्रचारासाठी आणलं अन् उन्हातान्हात उपाशी ठेवलं

दरम्यान भद्रा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात काँग्रेसचे (Congress) नगरसेवक राजाराम गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीत गायकवाड यांनी मला आक्षेपार्य आणि अश्लील भाषेचा वापर करून दमदाटी केली असल्याची तक्रार भद्रा यांनी दिली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com