Kolhapur Constituencies - ..तर कोल्हापूरकरांना ३ खासदार १३ आमदार मिळणार; नव्या मतदारसंघांचे संकेत!

Census Impact on Kolhapur -केंद्र सरकारने नव्या जनगणनेची तयारी सुरू केल्यानंतर जिल्ह्यातील मतदार संघाची पुनर्रचना होणार आहे
Kolhapur
KolhapurSarkarnama
Published on
Updated on

Impact of Central Government’s New Census on Kolhapur- कोल्हापूरकरांना पूर्वी दोन खासदार, दहा आमदार जिल्ह्यातून निवडून द्यावे लागत होते. केंद्र सरकारने जनगणनेची घोषणा केल्यानंतर जिल्ह्यातील खासदार आणि आमदारांच्या मध्ये वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. जनगणनेनुसार जिल्ह्यातील लोकसंख्या वाढण्याची शक्यता आहे. याच लोकसंख्येनुसार विधानसभा मतदारसंघाचे रचना होत असते.

त्यामुळे नवीन जनगणनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेची एक आणि विधानसभेच्या तीन जागा आणखीन वाढू शकतात. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील राजकीय रचना पुन्हा एकदा बदलू शकते. यापूर्वी 2009 ला मतदारसंघाचे राजकीय बदल झाले होते.

2009 पूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघांची संख्या 12 होती. पूर्वी गडहिंग्लज आणि सांगरूळ विधानसभा मतदारसंघ होते . त्यातील सांगरूळ नंतरच्या काळात करवीर विधानसभा मतदारसंघ आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघात विभागण्यात आला. गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघ हा चंदगड आणि कागल मध्ये विभागण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांची संख्या 10 इतकीच राहिली. केंद्र सरकारने नव्या जनगणनेची तयारी सुरू केल्यानंतर जिल्ह्यातील मतदार संघाची पुनर्रचना होणार आहे.

Kolhapur
Mahayuti and Kolhapur Election - स्थानिक निवडणुकांमध्ये जागावाटपच ठरू शकतो महायुतीतील कळीचा मुद्दा, कारण...

सध्या जिल्ह्यात दहा विधानसभा मतदारसंघांची संख्या आहे. त्यातील सर्वात कमी मतदार संख्या ही कोल्हापूर उत्तर तर सर्वाधिक मतदार संख्या ही कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाची आहे. सध्याची परिस्थिती पाहता प्रत्येक विधानसभा मतदारसंघांची लोकसंख्या तीन लाख पर्यंत आहे. पण नव्या सूत्रानुसार प्रत्येक मतदारसंघ हा अडीच लाख मतदारांचा असावा, असा मानस आहे. असे ठरल्यास जिल्ह्यात तिने तीन मतदारसंघ वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मुरब्बी नेत्यांकडून अशा राजकीय रचनेचा अंदाज घेतला जात आहे.

Kolhapur
Kolhapur traffic jam issue : वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर अखेर कोल्हापूर प्रशासन ॲक्शन मोडवर!

दरम्यान ज्या मतदार संघांची रचना होण्याचा अंदाज आहे अशा मतदारसंघातील आमदार खासदारांनी या रचनेचा राजकीय अंदाज घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. एवढच नव्हे तर काहीजणांनी निवडणूक आयोगातील निवृत्त अधिकाऱ्यांशीही संपर्क ठेवला आहे. त्यातील काहींनी संपर्क केला असून त्याचा अंदाज घेऊन ज्या त्या मतदारसंघात संपर्क वाढवला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com