कोल्हापूर महापालिकेत महायुतीची सत्ता स्थापन झाली असून भाजपच्या रुपाराणी निकम या महापौर होणार असल्याचं निश्चित झालं आहे. तर उपमहापौरपदी जनसुराज्य पक्षाच्या अक्षय जरग यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. पण इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद कमी पडली. त्यामुळं आपली ताकद कमी असली तरी काही महत्वाच्या गोष्टी पदरात पाडून घेण्यासाठी हसन मुश्रीफ आग्रही आहेत. याबाबत महायुती आपल्याला योग्य तो न्याय देईल असं त्यांनी म्हटलं आहे. याबाबत चंद्रकांत पाटील आणि राजेश क्षीरसागर यांच्याशी आपली चर्चा झाल्याच त्यांनी सांगितलं.
हसन मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर महापालिकेत राष्ट्रवादीची शक्ती कमी आहे, मात्र योग्य ते, आम्हाला द्यायचे ते महायुती देईल. दर वेळेला आम्ही स्वतंत्र लढत होतो. पद वाटून घेत होतो मात्र आता मी एकसंघ लढलो आहे. आमच्या प्रचाराचा देखील फायदा मोठ्या प्रमाणात महायुतीला झाला आहे. याबाबत चंद्रकांत दादा पाटील राजेश क्षीरसागर यांच्याशी माजी चर्चा झालेली आहे. ते योग्य तो न्याय आम्हाला देतील, याची आम्हाला खात्री आहे. लोकांच्या अपेक्षा जास्त असतात. आम्हालाही वाटत होतं की, महापौरपदाची खांडोळी होत आहे. त्यावेळी आम्ही टीका करत होतो. मात्र आम्हालाही लक्षात आले की, लोकांना एकसंघ ठेवायचं असेल, तर पदंही वाटून द्यावी लागतात. महापौर वर्षाचा, सव्वा वर्षाचा पाच वर्षाचा होणार यापेक्षा प्रशासन एकसंघ ठेवून काम कसं करणार हे महत्त्वाचं. तिन्ही पक्षाचे नेते एकसंघाने काम चांगलं कसं करणार हे फार महत्वाच आहे. खुर्चीवर कोण बसणार कोण बसणार नाही याला मी फार महत्त्व देत नाही" असंही मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवरही त्यांनी भाष्य केलं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत निवडणुकीच्या प्रचारामधून अजितदादा नेहमी बोलत होते. मात्र, त्यांनी आमच्यासोबत याबाबत कधीही चर्चा केली नाही. तसंच दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. जयंत पाटील मला दोन ते तीन वेळा म्हणाले होते. अजित दादा याबाबत बोलले आहेत. पण दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची कोणतीही बैठक या संदर्भात झालेली नाही. त्यावर आता चर्चा करणे अर्थ नाही अशा शब्दात मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीच्या विलेनीकरणावर मोठी माहिती दिली आहे.
त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत खुलासा केलेला आहे. शरद पवार साहेबांनी देखील भाजपबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हटलं आहे. याला जोडूनच मुख्यमंत्री म्हणाले, अजितदादा सरकारमधून बाहेर पडणार होते का? याबाबत भारतीय जनता पार्टीबरोबर बोलणी झाली नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं दोन दिवसांपासून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुरू असलेल्या चर्चांवर मंत्री मुश्रीफ यांनी फुलस्टॉप दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.