

Political career of Sunetra Pawar as potentially NCP Chief: अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर आता राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची सुत्र त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी हाती घेतली आहेत. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुराही त्यांच्याच खांद्यावर देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
कारण सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीचं अध्यक्ष बनवा अशी मागणी आता पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडं पत्राद्वारे केली आहे. त्यामुळं लवकरच अजित पवारांनंतर आता सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतीक विभागाचे प्रमुख बाबासाहेब पाटील यांनी यासंदर्भात आपल्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये राष्ट्रवादीतील ३० महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची नाव असून या सर्वांनी एकमतानं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा अजित पवार यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे. हे सर्व पदाधिकारी हे राष्ट्रवादीच्या विविध सेल्सचे प्रमुख आहेत. त्यामुळं या वेगवेगळ्या विभागांतर्गत येणाने नेते आणि कार्यकर्ते या सर्वांचीच हीच इच्छा असल्याचं प्रतित होत आहे.
सध्या पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल पटेल हे काम पाहात आहेत. पण पक्षाच्या घटनेनुसार अध्यक्षपद हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय पक्षासंदर्भातील महत्वाचे निर्णय घेतले जाऊ शकत नाहीत. त्यामुळं अजित पवारांनंतर रिक्त झालेल्या या पदावर लवकरात लवकर नेमणूक होणं गरजेच असणार आहे. कारण त्याशिवाय पुढील महत्वाच्या गोष्टी मार्गी लागू शकणार नाहीत. म्हणूनच हे पत्र प्राप्त झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बैठक होऊन त्यात सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काल अचानक एका प्रफुल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बनल्याच्या बातम्या आल्या. पण त्या चुकीच्या असल्याचं खुद्द पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं आणि आमचा पक्ष हा लोकशाही मार्गानं चालणारा पक्ष असून सर्वांशी चर्चा झाल्यानंतरच अध्यक्षपदाबाबत निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.