Hasan Mushrif : हिंसाचार, अनेकांची घर उद्ध्वस्त, अखेर कोल्हापूरच्या 'पालक'मंत्र्यांना मिळाला मुहूर्त; हसन मुश्रीफ गजापूरला जाणार

Vishalgad Riots : या घटनेकडे पाठ फिरवून केवळ राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना विशाळगडकडे पाठविण्याच्या तयारीत पालकमंत्री मुश्रीफ होते. मात्र...
hasan mushrif.jpg
hasan mushrif.jpgsarkarnama
Published on
Updated on

Hasan Mushrif On Vishalgad Riots : विशाळगड येथील गजापूर पैकी मुसलमानवाडी येथे झालेल्या हिंसाचाराच्या पाचव्या दिवसानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना घटनास्थळी जाण्याचा मुहूर्त मिळाला आहे. आज दुपारी ते घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत.

वास्तविक पालकमंत्री या नात्याने या घटनेचे गांभीर्यानं दखल घेऊन तात्काळ घटनास्थळी भेट देणे गरजेचे होते. मात्र, शुक्रवारी आज ते गजापूर येथे भेट देणार आहेत. गुरूवारी 'इंडिया' आघाडीने काढलेल्या 'समता रॅली'त पालकमंत्री मुश्रीफ यांना जाब विचारू, शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांना पालकमंत्री या ठिकाणी आले नसल्याचे तक्रार स्थानिकांनी केली होती. त्यानंतर पालकमंत्री मुश्रीफ आज विशाळगडला जात आहेत की काय? असा सवाल उपस्थित झाला आहे.

या घटनेकडे पाठ फिरवून केवळ राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना विशाळगडकडे पाठविण्याच्या तयारीत पालकमंत्री मुश्रीफ ( hasan Mushrif ) होते. मात्र, गुरूवारी अचानक पालकमंत्री मुश्रीफ यांनी दौरा नियोजित केला आहे. हिंसाचारची घटना रविवारी घडली. त्यानंतर पुढील दोन दिवस पालकमंत्री मुश्रीफ यांनी त्यावर वक्तव्य करणे टाळले.

सोमवारी, कोल्हापुरात आल्यानंतर त्यांनी मंगळवार, बुधवारी विविध विकासकामांचा आढावा घेतला. गडहिंग्लज, कागलमध्ये दौरे केले. पण, घटनास्थळी जाण्याचा निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे पालकमंत्री मुश्रीफ दौरा करणार की नाही? याबाबत उलटसुलट चर्चा होती.

hasan mushrif.jpg
Sambhaji Chhatrapati News : संभाजीराजे छत्रपतींनी मुख्यमंत्री शिंदेंना पाठवलं विशेष पत्र, आता केली आहे 'ही' मागणी!

कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी शुक्रवारी आज विशाळगडाला भेट देणार आहेत. विशाळगड घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांत सलोखा निर्माण व्हावा आणि पीडितांना अत्यावश्यक वस्तूंची मदत देण्याच्यादृष्टीने हे पदाधिकारी ही भेट देणार आहेत. पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

hasan mushrif.jpg
Ajit Pawar : विशाळगड हिंसाचारातील पीडितांना अजितदादांचा शब्द; म्हणाले, तोपर्यंत रहिवासी अतिक्रमणाला हात लावणार नाही

शुक्रवारी सकाळी 11 वाजता आंबा येथे दिवंगत खासदार कै. उदयसिंहराव गायकवाड यांच्या पर्णकुटी या निवासस्थानी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जमण्याचे आवाहनही पत्रकात केले आहे. दरम्यान, दुपारी 1 वाजता पालकमंत्री हसन मुश्रीफ हे कोल्हापूर विमानतळ येथे दाखल होणार आहेत. त्यानंतर ते 2 वाजता गजापूर येथे भेट देणार आहेत.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com