Dhairyasheel Mane: मतांसाठी काँग्रेसचे राजकारण, शिवभक्तांना अतिरेकी म्हणणे दुर्दैवी; धैर्यशील मानेनी मौन सोडलं....

MP Dhaisheel Mane ON Vishalgad riots Congress politics for votes:इम्तियाज जलील यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आमच्याकडे मतांची भीक मागितली. त्याच्या या विधानामुळे कोल्हापूरच्या गादीचा अवमान झाला नाही का?, याचा जाब काँग्रेस इम्तियाज जलील यांना विचारणार का?
MP Dhaisheel Mane
MP Dhaisheel ManeSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur: विशाळगड येथील गजापूर पैकी मुसलमान वाडी येथे (Vishalgad riots) झालेल्या घटनेनंतर विद्यमान खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनी चार दिवसानंतर अखेर मौन सोडले आहे. घटनेवर केवळ निषेध व्यक्त करत काँग्रेस आणि इंडिया गाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.या घटनेला जिल्हा प्रशासनाला जबाबदार धरत काँग्रेसच्या भूमिकेचा समाचार त्यांनी घेतला आहे.

इंडिया आघाडीचे नेते घटनास्थळी गेल्यानंतर शिवभक्तांना अतिरेकी म्हणून संबोधले जाते. याचे चिंतन काँग्रेसने करावे. गजापुरात संचारबंदी लागू असताना काँग्रेसचे नेते गेले. खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांचा स्वभाव सरळसाधा आहे. त्यांची ढाल करून काहीजण राजकीय पोळ्या भाजण्याचे काम करत आहेत, असा आरोप खासदार धैर्यशील माने यांनी केला. ते पत्रकार परिषदेत कोल्हापूर येथे बोलत होते.

विशाळगडाच्या घटनेवरून बोलताना माजी खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आमच्याकडे मतांची भीक मागितली. त्याच्या या विधानामुळे कोल्हापूरच्या गादीचा अवमान झाला नाही का?, याचा जाब काँग्रेस इम्तियाज जलील यांना विचारणार का? असा सवाल धैर्यशील माने यांनी केला.

MP Dhaisheel Mane
Vilas Lande: भाचा अजित गव्हाणेसोबत मामा विलास लांडे यांची का झाली नाही शरद पवार राष्ट्रवादीत घरवापसी

काही महिन्यापूर्वी दसरा चौकातील शाळेच्या बसवर झालेल्या दगडफेकीबद्दल ब्र शब्दही काढत नाहीत. तेही निष्पाप होते. मग गजापूरच्यां घटनेवर बोलत आहेत. आगामी निवडणुकीत मतांसाठी काँग्रेसचे राजकारण सुरु आहे, असेही खासदार माने म्हणाले.

अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर खासदार माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. आजपर्यंत प्रशासनाने हे भिजत घोंगडे ठेवले होते.

गजापुरात जी चुकीची घटना घडली ती शिवभक्तांकडून होणार नाही. यामध्ये एक प्रकारचा पॅटर्न दिसतो. त्यामुळे तोडफोड करणारे नेमके कोण होते, ते कोठून आले या सर्वांची सखोल चौकशी करावी. तर महिनाभरापूर्वी काही नेत्यांनी दंगल होण्याची भाकीत केले होते त्यांची ही चौकशी करावी असे खासदार माने म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com