Kolhapur Municipal Corporator : कोल्हापूर महापालिकेत मोठा भूकंप? 19 नगरसेवकांची खुर्ची धोक्यात; सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये आरपारची लढाई! पाहा काय घडतंय पडद्यामागे!

Kolhapur corporation political crisis latest update : कोल्हापूर महापालिकेतील 19 नगरसेवकांचे सदस्यत्व धोक्यात आल्याची चर्चा रंगली आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात कारवाईसाठी तयारी करत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
Kolhapur Municipal Corporation
Kolhapur Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर महानगरपालिकेत भाजपचे नगरसेवक विजयसिंह उर्फ रिंकू देसाई यांचा जातीचा दाखला अवैध ठरल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेतील इतर नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत. सत्ताधारी व विरोधकांमध्ये एकमेकांचा काटा काढण्याचे स्पर्धा सुरू झाल्याने जवळपास नऊ जणांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या असून अद्याप अकरा जणांनी जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल केले नसल्याने जवळपास 19 नगरसेवकांमागे कारवाईचा बडगा उगारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवाय परस्पर विरोधी उमेदवारांकडून नगरसेवकांचे पद रद्द होण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेची पाच वर्षांपासून रखडलेली निवडणूक ही जानेवारी महिन्यात पार पडली. अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत महायुतीने महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवला. मात्र महायुती विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाल्यानंतर एकमेकांचे पद रद्द करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. अशातून तब्बल नऊ नगरसेवकांच्या विरोधात परस्पर विरोधकांनी तक्रारी दाखल केले आहेत. तर अद्याप अकरा जणांनी जात वैधता प्रमाणपत्र सुद्धा दाखल केलेले नाही. अशा नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत.

Kolhapur Municipal Corporation
Andhare Vs Kulkarni : महात्मा फुले वाड्यात वटपौर्णिमा,'...तो शुद्ध हलकटपणा,कारस्थान', मेधा कुलकर्णींवर सुषमा अंधारेंचा तीव्र संताप

जात वैधता प्रमाण जमा न करणाऱ्या नगरसेवकांमध्ये भाजपचे चार, काँग्रेसचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचा प्रत्येकी एक अशा 11 जणांचा समावेश आहे. त्यामध्ये भाजपचे विजयसिंह देसाई यांचा दाखला अवैध ठरवण्यात आला आहे. शिवाय जात वैधता प्रमाण दाखल केलेले तब्बल नऊ नगरसेवकांबाबत तक्रार झाली आहे.

भाजपचे नगरसेवक विजयसिंह देसाई यांचा दाखला अवैध ठरवल्यानंतर त्यांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेतील सध्याच्या नगरसेवकांची परिस्थिती पाहिली तर स्थायी समिती सभापती महिला बालकल्याण समिती सभापती आणि अन्य समितीतील सदस्यांनी देखील आपले जात प्रमाणपत्र दाखल केले नसल्याने त्यांचे देखील धाबे दणाणले आहेत.

Kolhapur Municipal Corporation
Maharashtra Education: ‘सेटिंग’ला ब्रेक! शिक्षण विभागात ६९ अधिकाऱ्यांच्या बदल्या; एका निर्णयाने वर्षानुवर्षांची मक्तेदारी संपली

निवडणूक निकाल झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र दाखल करणे हे अनिवार्य आहे. मात्र राज्यातील अनेक नगरसेवकांनी आपले जात वैधता प्रमाण दाखल केले नसल्याने राज्य सरकारने आणखीन सहा महिने मुदतवाढ दिली आहे. मात्र एका नगरसेवकांवर कारवाई झाल्यानंतर उर्वरित नगरसेवकांची जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com