Kolhapur Mahapalika Election : कोल्हापुरात आजी-माजी आमदारांचे पुत्र महापालिकेच्या रिंगणात : शिवसेनेकडून दोघांचीही उमेदवारी फायनल

ShivSena Candidates : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत दोन आमदारांचे पुत्र शिवसेनेतर्फे मैदानात उतरल्याने राजकीय वातावरण तापले असून प्रभागनिहाय लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ruturaj Kshirsagar and Satyajit Jadhav
Ruturaj Kshirsagar and Satyajit JadhavSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर महानगरपालिकेच्या रिंगणात आजी-माजी आमदार पुत्रांची उमेदवारी जवळपास अंतिम झाली आहे. कोल्हापूर उत्तरचे आमदार, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज शिरसागर आणि दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव, माजी आमदार जयश्री जाधव यांचे पुत्र सत्यजित जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. शिवसेनेकडून या दोघांचीही उमेदवारी निश्चित मानली जाते.

राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांनी अनेक दिवसांपूर्वीच महापालिका निवडणुकीची तयारी केली होती. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर त्यांची प्रचारात आघाडी दिसू येते. प्रभाग क्रमांक 7 मधून त्यांची उमेदवारी शिवसेनेकडून निश्चित मानली जात आहे.

तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक 18 मधून दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव आणि माजी आमदार जयश्री जाधव यांचे चिरंजीव सत्यजित जाधव यांची सर्वसाधारण गटातून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. काल रात्री उशिरापर्यंत या नावावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर प्रभाग क्रमांक 18 मधून सत्यजित जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे.

Ruturaj Kshirsagar and Satyajit Jadhav
Operation Lotus : पुण्यात 'ऑपरेशन लोटस' यशस्वी, तब्बल 22 जण भाजपमध्ये; शरद पवारांच्या आमदार पुत्रासह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दिग्गजांच्या हाती कमळ, संपूर्ण यादीच वाचा

2019 च्या निवडणुकीत दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव हे काँग्रेस मधून आमदार झाले. मात्र दोनच वर्षात त्यांचे निधन झाले. नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी जयश्री जाधव या काँग्रेसमधून आमदार झाल्या. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र राज्यातील परिस्थिती बदलली तशी कोल्हापूर शहरातील परिस्थिती बदलली.

Ruturaj Kshirsagar and Satyajit Jadhav
Kolhapur Politics : नगरपालिकेचे काउंटडाऊन: मामा भाच्याच्या विजयासाठी लागली पाच लाखाची पैज

माजी आमदार जयश्री जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आता महानगरपालिका निवडणुकीत जाधव यांच्या घरातील उमेदवार असावेत अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यासाठी स्थानिक नेत्यांवर कार्यकर्त्यांनी दबाव वाढवला. रात्री उशिरा त्यावर चर्चा झाल्यानंतर जाधव यांच्या उमेदवारीवर निर्णय घेतल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com