

Kolhapur News: कोल्हापूर महानगरपालिका महापौर पदासाठी महायुतीच्या उमेदवाराची आज घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केली. महापौर पदासाठी रूपाराणी निकम यांचं नाव घोषित करण्यात आले.
तर उपमहापौर पदी जनसुराज्य पक्षाच्या अक्षय जरग यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आज दुपारी या दोन्ही पदासाठी महायु्तीकडून अर्ज दाखल करण्यात येणार आहे. पहिल्यांदा भाजपचा महापौर होणार असून त्याचा कार्यकाळ सव्वा वर्ष असणार आहे.
येथील विमानतळावर आज मध्यरात्री बाराच्या दरम्यान एकनाथ शिंदे यांच्याशी जनसुराज्य पक्षाचे प्रमुख आमदार विनय कोरे तसेच शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने यांनी उपमहापौर पदासंदर्भात चर्चा केली. त्यावेळी शिंदे यांनी उपमहापौरपदासाठी जनसुराज्यचे अक्षय जरग यांना संधी देण्यास हिरवा कंदील दाखविला आहे.
शिवसेनेला महापालिकेत पाठिंबा देण्याच्या बदल्यात उपमहापौरपद व स्थायी समितीमधील एक सदस्य पद जनसुराज्य पक्षाला देण्याचे ठरले आहे. महायुतीअंतर्गत पद वाटप फॉर्म्युलानुसार उपमहापौरपद शिवसेनेकडे आहे. आता उपमहापौरपदासाठी उमेदवार शिवसेनेचा की जनसुराज्य पक्षाचा उमेदवार असेल, याची निश्चिती मात्र आज अर्ज भरतानाच होणार आहे. शिवसेनेने या पदावर जनसुराज्यशक्ती पक्षाला संधी देण्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. यावेळी जनसुराज्यचे समित कदमही उपस्थित होते.
सर्वसाधारण गटातून निवडून आलेलेही इच्छुक होते. यातून विजयसिंह खाडे-पाटील, रुपाराणी निकम, विशाल शिराळे, विजयसिंह देसाई, प्रमोद देसाई, वैभव कुंभार ही नावे शेवटच्या टप्प्यात आघाडीवर आहेत. आज सर्वांना कागदपत्रे घेऊन भाजप कार्यालयात बोलवले असून दुपारी नाव निश्चित होणार आहे. भाजप प्रदेश कार्यालयाकडून ज्या नावाबाबत हिरवा कंदील दाखवला जाईल, त्यांचे नाव उद्या सकाळी मंत्री चंद्रकांत पाटील हे नगरसेवकांच्या बैठकीत जाहीर करतील. दुपारी तीननंतर त्या अंतिम नावाच्या उमेदवाराबरोबरच आणखी एक डमी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.