Kolhapur mayor election : कोल्हापूरच्या महापौरपदासाठी भाजपचा आग्रह, कोणाचे नशीब उजळणार?

Kolhapur Municipal Corporation : महायुतीने बहुमताचा आकडा गाठल्याने महापौर कोण होणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे. पण, त्यासाठी अजून महापौरपदाचे आरक्षणच जाहीर झालेले नसल्याने इच्छुक असलेल्या नगरसेवकांचे त्याकडे लक्ष लागले आहे. आज दिवसभरात भाजपच्या जागा जास्त आल्यानंतर या पदावर आता मात्र भाजपचा आग्रह असणार आहे.
Leaders and newly elected corporators gather at Kolhapur Municipal Corporation as Mahayuti’s mayoral claim strengthens after securing majority seats.
Kolhapur Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 17 Jan : कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता आल्यानंतर येत्या दोन दिवसात अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आज महापौर आरक्षण सोडत असल्याने सर्वांच्या नजरा त्याकडे लागून राहिल्या आहेत. महायुतीमध्ये सर्वात जास्त जागा घेणारा पक्ष हा भाजप ठरला असून त्या पाठोपाठ शिवसेना देखील ठरली आहे.

महायुतीने बहुमताचा आकडा गाठल्याने महापौर कोण होणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे. पण, त्यासाठी अजून महापौरपदाचे आरक्षणच जाहीर झालेले नसल्याने इच्छुक असलेल्या नगरसेवकांचे त्याकडे लक्ष लागले आहे. आज दिवसभरात भाजपच्या जागा जास्त आल्यानंतर या पदावर आता मात्र भाजपचा आग्रह असणार आहे.

महायुतीचे ४५ नगरसेवक निवडून आलेत, तर काँग्रेस आघाडीचे ३५ नगरसेवक आहेत. ८१ नगरसेवक असल्याने बहुमतासाठी ४१ नगरसेवक लागतात. महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचा एकमेव नगरसेवक आहे. राज्यातील भाजप, शिवसेना शिंदे गटाच्या सत्तेत तो मित्रपक्ष आहे. त्यामुळे हा पक्ष महायुतीसोबत जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसला बहुमतासाठी आणखी सहा नगरसेवक लागतील.

Leaders and newly elected corporators gather at Kolhapur Municipal Corporation as Mahayuti’s mayoral claim strengthens after securing majority seats.
Maharashtra Municipal Results 2026 : सर्व 29 महापालिकांमध्ये कोणी किती जागा जिंकल्या? फायनल आकडा काय? कोणाची सत्ता येणार? सगळ्या प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर

सध्याची स्थिती पाहता महायुतीचा महापौर होण्यास काहीच अडचण दिसत नाही. अजून महापौरपदाचे आरक्षण मात्र जाहीर झालेले नाही. गेल्या सभागृहातील पाच वर्षांच्या पूर्ण कालावधीत महापौरपद महिलांसाठी आरक्षित होते. त्यामुळे आता महिलांसाठी आरक्षण पडण्याची शक्यता कमी दिसते. पुरुष गटासाठी पद राहिले, तर त्यात आरक्षणही पडू शकते.

Leaders and newly elected corporators gather at Kolhapur Municipal Corporation as Mahayuti’s mayoral claim strengthens after securing majority seats.
Raj Thackeray : काय चुकलं? काय कमी पडलं? 6 नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील!पराभवानंतर राज ठाकरेंची भावूक पोस्ट

पुरुष प्रवर्गाकडे हे पद आल्यास महायुतीत मोठी स्पर्धा होऊ शकते. भाजपचे २६ नगरसेवक असून, शिवसेनेचे १५ नगरसेवक आहेत. महापौर महायुतीचा होणार असला, तरी पहिला महापौर कोण याकडे आता लक्ष लागले आहे. २६ जानेवारीनंतर महापौर निवड शक्य आहे. विजयी झालेल्या नगरसेवकांची नोंदणी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने सोमवारपासून प्रक्रिया राबवली जाईल.

त्यानुसार संबंधित पक्ष किंवा आघाडी स्थापन करून त्याचे गॅझेट करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे पाठवली जाणार आहेत. त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण होत असताना जर महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाले, तर त्यानुसार आवश्यक कालावधीत महापौर निवडीसाठी सभा बोलवण्यात येणार आहे. त्याबरोबर उपमहापौरपदाचीही निवड होईल. २६ जानेवारीनंतर सभा होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com