

Kolhapur News : वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख व राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फरास यांच्यात आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड यांच्या कार्यालयातच एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडल्यानंतर बुधवारी आयुक्तांनी महत्त्वपूर्ण आदेश दिले. दोन्ही गटाच्या बाजूच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिका परिसरात गर्दी केल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी 3 सप्टेंबर रोजी होणारी सर्वसाधारण विशेष सभा पोलीस बंदोबस्तात घेण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. त्या संदर्भातील आदेश बुधवारी काढण्यात आले. ही सभा शिस्तप्रिय होण्यासाठी 12 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बुधवारी वृक्ष संवर्धनाच्या बैठकीत शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आदिल फरास हे भिडले होते. या वादाच्या प्रकारानंतर आयुक्त राजेंद्र भारूड यांनी विशेष सभाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून गुरुवारी एक वाजता ही बैठक होणार आहे.
गुरुवारी दुपारी एक वाजता ही सभा सुरुवात होणार असून सभा संपेपर्यंत कोल्हापूर महानगरपालिका मुख्यालय, सभास्थळ, आणि प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त असणार आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्यांना महापालिकेत प्रवेश दिला जाणार नाही. बुधवारी उद्भवलेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यक त्या प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
त्यासोबतच यापुढे महापालिकेत होणाऱ्या स्थायी समिती सभा, विशेष सभा व सर्वसाधारण सभा सुरळीत पार पडावी म्हणून बारा अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविली आहे. सहायक आयुक्त संजय सरनाईक, विजय पाटील हे मतमोजणी अधिकारी तर कामगार अधिकारी राम काटकर, अधीक्षक अशोक यादव हे सहायक मतमोजणी अधिकारी, व्हिडिओ चित्रीकरण, छायाचित्रण व प्रसिद्धीच्या अनुषंगाने जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी, संगणकीय मतदान प्रणाली व तांत्रिक व्यवस्था सिस्टीम मॅनेजर यशपाल रजपूत, विद्युत व्यवस्था विद्युत अभियंता नारायण पुजारी, मतदान साहित्य व अभिलेख व्यवस्था प्रभारी सहायक अधीक्षक विजय पाटील, स्वच्छता नियोजन व्यवस्था उपशहर अभियंता सुरेश पाटील, इमारत परिसर स्वच्छता व्यवस्था मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.