Kolhapur Politics : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभागाचे गणित ठरले, प्रारूप प्रभागरचना जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर होणार

Kolhapur Municipal Ward Structure : कोल्हापूर महापालिकेची निवडणूक सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर येत्या 4 ते 5 महिन्यात घेतली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून 4 सदस्य प्रभाग रचनेनुसार निवडणूक होणार असल्याने त्या संदर्भात प्रारूप प्रभाग रचना करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला दिल्या होत्या.
Kolhapur Municipal Election 2025
Kolhapur Municipal Election 2025Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 08 Aug : गेल्या पाच वर्षांपासून रखडलेली कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर येत्या 4 ते 5 महिन्यात घेतली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून चार सदस्य प्रभाग रचनेनुसार निवडणूक होणार असल्याने त्या संदर्भात प्रारूप प्रभाग रचना करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या होत्या.

त्या संदर्भातील निवडणुकींसाठी तयार केलेला प्रभाग रचनेचे प्रारूप आज कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सादर केले जाणार आहे. येत्या चार ते पाच दिवसात तो अहवाल नगरविकास विभागाकडे जाणार असून 9 ऑक्टोंबर रोजी त्याला अंतिम मान्यता मिळणार आहे.

पंधरवड्यात महापालिकेकडून प्रारूप प्रभागरचनेच्या कामाला वेग आला होता. 81 सदस्य असलेल्या सभागृहासाठी चार सदस्यांचे 20 प्रभाग तयार करण्यात आले. त्यांच्या हद्दी प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन तपासण्यात आल्या. त्यातील काही अडचणीच्या वाटत होत्या, त्या बदलण्यात आल्या.

Kolhapur Municipal Election 2025
Omar Abdullah Government : काँग्रेसनं पायावर धोंडा पाडून घेतला; काश्मीरमध्ये होणार बंगालची पुनरावृत्ती ?  

त्यामुळे काही प्रभागांतील भाग कमी-जास्त झाले आहेत. महापालिकेतीव नियुक्त समितीच्या सह्यांनिशी बनवलेले प्रारूप जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याची व नगरविकास विभागास सादर करण्याची मुदत 12 ऑगस्टपर्यंत आहे.

Kolhapur Municipal Election 2025
Almatty Dam : कर्नाटक भाजपचे महाराष्ट्राविरोधात वाकडे पाऊल, अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी, वाद चिघळणार?

तर प्रशासक के. मंजुलक्ष्मी परगावी असल्याने हा प्रारूप प्रस्ताव आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून तो पुढे शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. 25 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत या प्रारूप प्रभागरचनेला मंजुरी देऊन हरकती मागविण्यासाठी प्रसिद्ध केली जाणार असून सप्टेंबर महिन्यात हरकतींवर सुनावणी घेऊन अंतिम प्रभागरचना केली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com