Mahapalika Nivadnuk: माघार घ्या, ४० लाख अन् फ्लॅट देतो! महायुतीकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आमिष?

Kolhapur Municipal Election 2026 News:महायुतीकडून शिव-शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी रोख ४० लाख रुपये, फ्लॅट देण्याचे आमिष दाखवले. पण त्याला शिव शाहू आघाडीचा एकही उमेदवार बळी पडला नाही.
Kolhapur Municipal Corporation
Kolhapur Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कोल्हापूर पाठोपाठ इचलकरंजी महानगरपालिकेचे राजकीय वातावरण देखील ढवळून निघाले आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी पुरस्कृत शिवशाही आघाडी यांच्यात थेट लढत होत असताना अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी शिव-शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप शिव-शाहू-आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला. उमेदवारांना 40 लाख रुपये देतो आणि फ्लॅट देतो, अशा पद्धतीचे आमिष दाखवण्यात आले असल्याचा आरोप शशांक बावचकर यांनी केला.

महायुतीकडून शिव-शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी रोख ४० लाख रुपये, फ्लॅट देण्याचे आमिष दाखवले. पण त्याला शिव शाहू आघाडीचा एकही उमेदवार बळी पडला नाही. सत्तेतील माजी आमदारानेही उमेदवाराला माघारीसाठी फोन केला होता, असा आरोप शशांक बावचकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

दोन दिवसांपूर्वी काँग्रेसने आमदार सतेज पाटील यांनी सभेत इचलकरंजी शहराला पाण्याची सोय करण्याबाबत आश्वासन दिले. मात्र त्यावर आमदार राहुल आवारे यांनी एकतर्फी भाषा वापरली. सत्ता असेल तरच पाणी मिळणार आहे, अशी वल्गना आमदार राहुल आवाडे करीत आहेत.

एकप्रकारे ते जनतेमध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. केएटीपी व तारदाळजवळ पाणी येते, तर इचलकरंजीला का येऊ शकत नाही? सवाल बावचकर यांनी केला.

Kolhapur Municipal Corporation
PMC News: पेट्रोलचा कोटा जास्त वापरल्यानंतर पालिकेत पायी जाणारे महापौर तुम्हाला माहीत आहे का? टेलिफोनचे अतिरिक्त बिल भरायचे....

सतेज पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी गेल्या २५ वर्षांत इचलकरंजीला पाणी का दिले नाही, हे सांगावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक वेळा इचलकरंजीला आले त्यांनी केवळ पाण्याचा आश्वासन दिले, असे म्हणत उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख कोणाच्या संगतीत असतात? कोणाचे काम करतात, हे तपासावे. असेही म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com