Kolhapur News : फोडलेले प्रभाग जसे होते तसे करा; कोल्हापूरमध्ये महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस

Municipal Corporation : महापालिकेच्या निवडणुकीसाठी 3 सप्टेंबरला चार सदस्यीय प्रभाग रचनेसाठी प्रारूप रचना जाहीर केली. त्यादिवसापासूनच हरकती, सूचना नोंदवण्यास सांगितले होते. 15 सप्टेंबर अंतिम तारीख होती.
Kolhapur Municipal Election 2025
Kolhapur Municipal Election 2025Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत शेवटच्या दिवशी तब्बल 34 हरकती आल्याने हरकती सूचनांची संख्या 55 झाली. त्यात बहुतांश प्रभागाच्या हद्दीवरील फुटलेल्या कॉलनी, गल्लींबाबत आहेत. पूर्वीच्या एक सदस्यीय प्रभाग रचनेतील प्रभाग फोडले जाऊ नयेत, चार सदस्यीयऐवजी एक सदस्यीय प्रभाग रचना ठेवावी, भागाची नावे बदलावीत, अशाही महत्त्‍वाच्या हरकती आहेत. या सर्व हरकतींवर जिल्हाधिकाऱ्यांकडून नेमण्यात येणाऱ्या अधिकाऱ्याकडून आता 22 सप्टेंबरपर्यंत एक दिवशी सुनावणी होणार आहे.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी 3 सप्टेंबरला चार सदस्यीय प्रभाग रचनेसाठी (Ward Structure) प्रारूप रचना जाहीर केली. त्यादिवसापासूनच हरकती, सूचना नोंदवण्यास सांगितले होते. 15 सप्टेंबर अंतिम तारीख होती. 14 पर्यंत केवळ 21 हरकती दाखल झाल्या होत्या. त्यामुळे शेवटच्या दिवशी फार हरकती येतील, अशी अपेक्षा नव्हती. पण आज (ता. 15) 34 हरकती आल्या.

कोल्हापूरमध्ये (Kolhapur) त्यात बहुतांश माजी नगरसेवकांच्यांच हरकती असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यांनी नोंदवलेल्या जास्तीतजास्त हरकती या चार सदस्यीय प्रभागांच्या हद्दीबाबत आहेत. त्या हद्दी निश्‍चित करताना काही कॉलनी, गल्ली दुसऱ्या प्रभागात जोडल्या आहेत. त्या पूर्वीच्या प्रभागाच्या हद्दीत ठेवाव्यात.

तसेच एक सदस्यीय प्रभागरचना असताना ज्या प्रभागांच्या हद्दी होत्या, त्याप्रमाणे या चार सदस्यीय प्रभागरचनेत ठेवाव्यात, अशी मागणी करत पूर्वीचे प्रभाग जैसे थे ठेवावेत, असे मांडले आहे. चार सदस्यीय प्रभाग रचनेवरही हरकत नोंदवली आहे. पूर्वीची एक सदस्यीय रचनाच ठेवावी अशी मागणी केली आहे.

Kolhapur Municipal Election 2025
Rupali Chakankar : महिला आयोगाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतरही रुपाली चाकणकर अजितदादांवर होत्या नाराज; काय होते कारण?

अनेक ठिकाणी भाग दाखवताना नकाशावर वेगळेच नाव टाकले गेले आहे. त्याचा शोध व्यवस्थित घेता येत नसल्याने तो भाग माहिती होण्यासाठी तेथील प्रचलित नावांचा वापर करावा, ही महत्त्‍वाची हरकत नोंदवली आहे.

भौगोलिक संलग्नता, प्रगणक गटाबाबत आक्षेप

प्रभाग क्रमांक चारच्या भौगोलिक रचनेचा अभ्यास केल्यानंतर पर्ल हॉटेलपासून सलग दाभोळकर कॉर्नर, ट्रेड सेंटरपर्यंत मुख्य रस्त्याची हद्द ठेवावी. त्यामुळे प्रभागाची भौगोलिक संलग्नता राखली जाईल, अशी हरकत रोहित कस्तुरे, महेश गवळी, विनायक चिले यांनी घेतली आहे. ॲड. सागर घोरपडे यांनी प्रभाग क्रमांक चार व १४ च्या रचनेच्या तसेच संपूर्ण रचनेच्या मसुद्यास हरकत घेतली आहे. प्रगणक गटांचा वापर करून प्रभागरचना केली असताना अनेक ठिकाणी हे प्रगणक गट फोडले आहेत. ते विभाजन आक्षेपार्ह असल्याचे नोंदवले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com