Rupali Chakankar : विरोधकांकडून महिला आयोगावर होणाऱ्या टीकेला रूपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर, म्हणाल्या, "हीच कामाची पावती..."

Rupali Chakankar responds to Opposition Over Vaishnavi Hagwane Case: पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली होती.
Rupali Chakankar
Rupali ChakankarSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात अखेर महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मौन सोडले.

  2. आज कुठल्याही प्रकरणात महिला आयोगाला ओढलं जातं हीच माझ्या कामाची पावती असे म्हणत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं.

  3. या वक्तव्यामुळे पुणे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधान आलं आहे.

Nagpur News : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात सर्वाधिक टीका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या कारभारावर करण्यात आली होती. महिला आयोगाचे अध्यक्षपद शोभेचे आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. तसेच आयोगाच्या निष्पक्षतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासह आयोग अत्यंत असंवेदनशील असल्याने अध्यक्ष पक्षविरहित असावा अशीही मागणी करण्यात आली होती.

या सर्व वादावर आणि टीकाटीपणीवर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी मौन सोडले आहे. त्यांनी, आज कुठल्याही प्रकरणात महिला आयोगाला ओढले जातेय. हीच माझ्या कामाची पावती असल्याचे सांगून त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी जबाबदारी सोपवली तेव्हा मी नाराज झाली होते. मात्र आयोगाच्या माध्यमातून हजारो महिलांना न्याय देता असल्याने आपली नाराजी नाही उलट आपण समाधानी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

नागपूरसह विदर्भातील काही शहरांमध्ये महिला आयोगाच्यावतीने जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. यासाठी रूपाली चाकणकर नागपूरमध्ये आल्या असत्या त्यांनी सकाळ कार्यालयाला सदिच्छा भेटी दिली. यावेळी त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या.

रूपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष होत्या. विधान परिषदेसाठी त्यांचे नाव आघाडीवर होते. त्यांच्या नावाची चर्चाही त्यावेळी माध्यमांमध्ये होती. मात्र याऐवजी त्यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे त्यांची थोडीफार नाराजी होती. त्यावेळी आयोग काय असतो आणि त्याचे काम काय असते हे आपल्याला ठाऊक नव्हते, असे स्पष्टीकरण चाकणकर यांनी दिले आहे.

Rupali Chakankar
Rohini Khadse VS Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांनी पोलिस आयुक्तांना पत्र पाठवताच रोहिणी खडसेंचा पलटवार; म्हणाल्या 'बॉल, बॅट आणि...'

अध्यक्ष झाल्यानंतर आयोगाचे गांभीर्य कळले. चार वर्षांच्या कार्यकाळात 35 ते 36 हजार तक्रारी निकाली काढल्या. अनेकांचे उध्वस्त होणारे संसार वाचविता आले. महिला व मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना न्यायालयामार्फत फाशी तसेच जन्मठेपेची शिक्षा सुनावता आली.

याचेही समाधान आहे. राहिला प्रश्न आमदार होण्याचा तर विधान परिषदेत मोजक्याच जागा असतात. त्यातही राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे. माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते पक्षासाठी दिवसरात्र झटत असतात.

त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षांना सर्वांचे समाधान करता येत नाही. त्यामानाने मी सुदैवी आहे. राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेले महिला आयोगाचे अध्यक्षपद मला मिळाले. विधान परिषदेसाठी माझे नाव आघाडीवर असल्याची बातमी माध्यमातूनच मला कळाली.

त्यावेळी ज्यांची ज्यांची नावे माध्यमांमधून झळकत होती त्यापैकी एकही आमदार झाला नाही. पक्षातून जोपर्यंत अधिकृतपणे निरोप येत नाही तो पर्यंत कोणाचे काही खरे नसते हे मी तुम्हाला अनुभवातून सांगते असेही त्यांनी मिष्किलपणे सांगितले.

आयोगाला न्यायालयाप्रमाणेच काम करावे लागते. निवाडा द्यावा लागतो. महिला अत्याचाराशी संबंधित प्रकरणे आयोगाकडे येतात. त्यामुळे नावे गुप्त ठेवावी लागते. महिलांची बदनामी होऊ नये, त्यांचे कुटुंब उध्वस्त होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. आयोगामार्फत कौटुंबिक वाद वाढणार नाही, घटस्फोट होऊ नये यासाठी शक्य तितके प्रयत्न केले जातात.

आयोगाचे काम 365 दिवस सुरू असते. मात्र त्याची प्रसिद्धी करता येत नसल्याने सांगून रूपाली चाकणकर यांनी हगवणे प्रकरणात माझ्यावर वैयक्तिक व आयोगावर आरोप करणाऱ्यांना नोटीस बजावल्यानंतर सर्वांनी माफी मागितली असल्याचेही यावेळी सांगितले.

Rupali Chakankar
Rupali Chakankar Politics: नाशिकच्या जिल्हा परिषद महिला कर्मचारी लैंगिक शोषण प्रकरणात रूपाली चाकणकरांच्या पाठपुराव्याला यश

FAQs :

प्र.1: वैष्णवी हगवणे प्रकरण काय आहे?
उ.1: पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण हे चर्चेत असलेले एक महत्त्वाचे प्रकरण असून त्यात महिला आयोगाचे नाव घेतले गेले आहे.

प्र.2: रूपाली चाकणकर यांनी काय प्रतिक्रिया दिली?
उ.2: त्यांनी सांगितलं की महिला आयोगाला कुठल्याही प्रकरणात ओढलं जाणं म्हणजे त्यांच्या कामाची पावती आहे.

प्र.3: विरोधकांनी कोणते आरोप केले?
उ.3: विरोधकांनी चाकणकर यांच्यावर वैष्णवी प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com